ग्रामीण वार्ताताज्या घडामोडीमहाराष्ट्र

बाळू धानोरकर यांच्या जयंतीनिमित्त वृद्धाश्रमात अभिवादन व फळवाटप

चांदा ब्लास्ट

घुग्घुस : चंद्रपूर – वणी – आर्णी लोकसभा क्षेत्राचे दिवंगत लोकप्रिय खासदार सुरेश ऊर्फ बाळू धानोरकर यांच्या जयंतीनिमित्त नवी दिशा वृद्धाश्रमात त्यांना आदरांजली अर्पण करण्यात आली. काँग्रेस शहराध्यक्ष राजुरेड्डी यांच्या मार्गदर्शनाखाली धानोरकर यांच्या प्रतिमेस माल्यार्पण करून प्रार्थना करण्यात आली.

या कार्यक्रमात वृद्धाश्रमातील ज्येष्ठ नागरिकांना फळवाटप करून त्यांचा सन्मान करण्यात आला.

यावेळी काँग्रेस नेते सैय्यद अनवर, जिल्हा सचिव अजय उपाध्ये, सोशल मीडिया जिल्हाध्यक्ष रोशन दंतलवार, एससी सेल तालुकाध्यक्ष राजकुमार वर्मा, तालुका उपाध्यक्ष श्रीनिवास गुडला, विजय माटला, सुनील पाटील, दिपक कांबळे, कपिल गोगला, कुमार रुद्रारप, अंकुश सपाटे, दिपक पेंदोर, अरविंद चहांदे, गणपत लभाने तसेच इतर पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.

कार्यक्रमाच्या आयोजनामुळे सामाजिक बांधिलकीचे उत्तम उदाहरण घालून देण्यात आले.

शेअर करा

Related Articles

Back to top button
कॉपी करू नये