देऊळगाव राजा येथे जागतिक अमली पदार्थ दिन साजरा

चांदा ब्लास्ट प्रतिनिधी. प्रा. अशोक डोईफोडे
पोलीस स्टेशन दे राजा येथे श्रीमती मनिषा कदम उपविभागीय पोलीस अधिकारी दे.राजा यांच्या मार्गदर्शनाखाली आज 26 जून रोजी जागतिक अमली पदार्थ विरोधी दिन नशा मुक्त भारत” अभियानांतर्गत जागतिक अमली पदार्थ विरोधी दिनानिमित्त पोलीस स्टेशनला नशा मुक्त भारत बाबत शपथ घेण्यात आली. शपथ घेण्याकरता पोलीस स्टेशनचे अधिकारी व अंमलदार हजर होते. तसेच श्री व्यंकटेश काॅलेज दे राजा व श्री शिवाजी हायस्कूल नगर परिषद दे राजा येथील विद्यार्थ्यांना नशा मुक्त भारत अमली पदार्थ दिनानिमित्त कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले होते. सदरचे कार्यशाळे करिता 09 वी चे एन सी सी चे विद्यार्थी व विद्यार्थिनी यांनी नशा मुक्ती अभियानाबाबत मार्गदर्शन केले व कार्यशाळेनंतर आदर्श विद्यालयाचे विद्यार्थी व विद्यार्थिनींची गावातून रॅली काढण्यात आली. कार्यशाळेला शिक्षक तसेच एन सी सी चे विद्यार्थी व विद्यार्थिनी हजर होत्या.