दिव्यांग बांधवांची म्हत्वाची बैठक संपन्न

चांदा ब्लास्ट प्रतिनिधी. प्रा. अशोक डोईफोडे
शिवाजी विद्यालय देऊळगाव मही येथे 25 मे रोजी दिव्यांग बैठक संपन्न झाली, भाऊ साहेब दसपुते व.सकल दिव्यांग सामाजिक संघटनेचे संस्थापक अध्यक्ष शंकर शिरगुळे, नुर चैधरी यांच्या मार्गदर्शनाखाली बैठक आयोजित करण्यात आली होती.
या बैठीकीत दिव्यांगांच्या विविध प्रलंबित मागण्या संजय गांधी, निराधार. दिव्यांग पाच टक्के निधी,अंत्योदय कार्ड, रेशन कार्ड घरकुल, शासनाच्या अटी शर्तीमुळे दिव्यांग लाभार्थी योजने पासून वंचित राहतात दिव्यांग कसे योजनेत बसतील यांच्याकडे शासनाने लक्ष केंद्रित केलं पाहिजे दिव्यांगाच्या अनेक समस्या संदर्भात सखोल चर्चा करुन लवकारत लवकर समस्या सोडवण्यासाठी पुढील आंदोलानाची दिशा ठरवण्यात येईलअसे ठरविण्यात आले.
बैठीकीचे आयोजन राजेंद्र चेके यांनी केले होते या बैठीकीचे सुत्रसंचालन नुर चौधरी यांनी केले याप्रसंगी सकल दिव्यांग सामाजिक संघटनेचे संस्थापक अध्यक्ष शंकर शिरगुळे म्हणाले की नुकत्याच दिव्यांग सोनु गाडेकर दृष्टिहीन महिला वय ३३ कांजुरमार्गा ते ठाणे नेहमी प्रमाणे प्रवास करत असतांनी दिव्यांगांसाठी आरक्षित असलेल्या डब्यात प्रवास करत आसताना त्या डब्यात एका व्यक्तिने त्या दिव्यांग महिलेला लाथा बुकीने मारहाण केली.
यामुळे संपूर्ण महाराष्ट्रातील दिव्यांग बांधवा मध्ये संतापाची लाट असुन सदरील घटना ही निंदनीय आहे ,या घटनेचा निषेध करून संबंधित व्यक्तीवर दिव्यांग हक्क २०१६ च्या कायद्याने गुन्हा दाखल करुन कडक शासन करावे अशी मागणी यावेळी शंकर शिरगुळे यांनी केली याप्रसंगी संचालन राजेंद्र चेके, यांनी केले,आभार प्रदर्शन अंबादास बुरुकुल यांनी केली.
यावेळी रामदास ढाले, रंगनाथ आपे, दिपक वाणी, शोबा बनकर, संजू आप्पा, नंदा वरडे, सदाशिव हांडे, संदीप जाधव. इत्यादी उपस्थित होते