मतदार संघाचा सर्वांगीण विकास हेच प्रमुख ध्येय.. विकास कामात अडथळा आणणाऱ्यांची गय केली जाणार नाही… आमदार- मनोज कायंदे.
मतदार संघातील विविध विकास कामांची आढावा बैठक संपन्न
चांदा ब्लास्ट प्रतिनिधी. प्रा. अशोक डोईफोडे
सिंदखेड राजा विधानसभा मतदार संघात विविध विकास कामे करताना सामान्य माणूस हाच केंद्रबिंदू.. समजून मतदार संघात काही किरकोळ कारणास्तव झालेली विकास कामे तात्काळ सुरू करा आणि कोणत्याही विकास कामात अडथळा आणल्यास त्यांना पाठीशी घातले जाणार नाही असे आज देऊळगाव राजा येथे नगरपालिका सभागृह आयोजित सिंदखेड राजा आणि देऊळगाव राजा दोन्ही तालुक्यातील तालुकास्तरीय अधिकाऱ्यांकडून विभागनिहाय कामांचा आढावा. घेण्यासाठी आयोजित आढावा बैठकीत अध्यक्ष स्थानावरून आमदार मनोज कायंदे बोलत होते.
सविस्तर वृत्त असे की गेल्या तीन दशकापासून सिंदखेडराजा विधानसभा मतदारसंघांमध्ये काही कारणास्तव राजकीय कुरघोडीमुळे वारंवार छोट्या मोठ्या कामात अडथळा निर्माण होत होता. प्रशासकीय अधिकाऱ्यांनी शासन निर्गमित कामे वेळेच्या आत पूर्ण करावे. त्यासाठी त्यांच्या कार्यप्रणालीत कसलाही राजकीय किंवा इतर प्रकारचे अडथळे येणार नाहीत याची सर्वतोपरी काळजी मी मतदार संघाचा प्रतिनिधी म्हणून घेईल. माझ्या नावाचा गैरवापर करून कोणी जर एखाद्या अधिकाऱ्यावर होणाऱ्या कामाविषयी दबाव आणत असेल तर त्यांनी प्रत्यक्ष संपर्क साधावा आणि त्याची शहानिशा करावी नियमबाह्य कामाची कसली ही शिफारस मी करणार नाही आणि ती अधिकाऱ्यांनी सुद्धा नियमबाह्य कामे करू नये शासनाकडून प्राप्त झालेला निधी प्रत्येक कार्यालय प्रमुखाने आपल्या विहित मुदतीत खर्च करून त्याचा अहवाल वरिष्ठाला नेहमीच सादर करावा. असे कायंदे यांनी सांगितले. मतदारसंघातील अवैध दारू विक्री बंद करा… मतदार संघात ग्रामीण भागामध्ये अवैध दारू विक्रीचे प्रमाण हे वाढले असून त्याला नवयुवक आहारी जात असून दिवसेंदिवस खेड्यापाड्यात वार्डामध्ये भांडण तंटे वाढत आहे याला आळा घालण्यासाठी पोलीस प्रशासनाने कठोर कार्यवाही करावी आणि अवैध दारू विक्रीचे उच्चाटन करावे. अशा प्रकारच्या सूचना मतदार संघातील सहा पोलीस स्टेशन प्रमुखांना दिल्या. आज झालेल्या बैठकीमध्ये प्रत्येक कार्यालयाचा लेखाजोखा कार्यालय प्रमुखांनी सादर केला. सादर केलेल्या लेखात अहवालामध्ये आमदारांनी मुद्देनिहाय सूचना देऊन. विकास कामात काही अडथळा आल्यास व्यक्तिशः संपर्क करावा अशा देखील सूचना दिल्या. क्षणचित्रे : नवनिर्वाचित आमदार मनोज कायंदे यांचीही मतदार संघातील पहिलीच आढावा बैठक असल्यामुळे एरवी अशा प्रकारच्या बैठकीकडे पाठ फिरवणाऱ्या अधिकाऱ्यांची झाडून पुसून उपस्थिती होती. नवनिर्वाचित आमदारांची पहिली बैठक असल्यामुळे मतदार संघातील तालुकास्तरीय अधिकाऱ्यांची विचारलेल्या प्रश्नांची उत्तरे देताना धंधेरी उडाली. काही कार्यालय प्रमुखांनी अर्धवट आपले अहवाल सादर केले त्यावर. आमदारांनी यापुढे असे काम खपवून घेणार नाही असे स्पष्टपणे सांगितले.
आजच्या आढावा बैठकीच्या अध्यक्षस्थानी आमदार मनोज कायंदे होते तर प्रमुख उपस्थितीमध्ये राष्ट्रवादी काँग्रेसचे जिल्हा अध्यक्ष नाझेर काजी, उपविभागीयअधिकारी प्राध्यापक संजय खडसे,माजी नगराध्यक्ष संतोष खांडेभराड, सतीश कायंदे, भगवान मुंडे, दिलीप सानप, तहसीलदार वैशाली डोंगर जाळ, मुख्याधिकारी अरुण मोकळ, सदाशिव मुंडे, दिलीप शेजुळकर, गजानन काकड, नितीन कायंदे,गटविकास अधिकारी विकास माहूर, गटशिक्षणाधिकारी दादाराव मुसदवाले, सिंदखेड राजा देऊळगाव राजा तालुक्यातील उपविभागीय अभियंता सार्वजनिक बांधकाम विभाग, उपविभागीय अधिकारी जिल्हा परिषद बांधकाम, उपअभियंता मृदा व जलसंधारण, उपविभागीय अभियंता जिल्हा परिषद सिंचन, उपविभागीय महाराष्ट्र राज्य रस्ते विकास प्राधिकरण, वनपरिक्षेत्र अधिकारी, भारतीय पुरातत्व विभाग,गट विकास अधिकारी,तालुका कृषी अधिकारी, तालुका आरोग्य अधिकारी, वैद्यकीय अधीक्षक ग्रामीण रुग्णालय, पशुसंवर्धन अधिकारी, उपकोषागार अधिकारी, उपाधीक्षक भूमी अभिलेख, दोन्ही तालुक्यातील सहा पोलीस स्टेशनचे ठाणेदार आणि इतर अधिकारी, उपकार्यकारी अभियंता महाराष्ट्र राज्य महावितरण,असे एकूणदोन्ही तालुक्यातील 29 कार्यालयाचे कार्यालय प्रमुख आणि त्यांचे कर्मचारी हजर होते