शिवाजीनगर येथील नागरीक ५७ वर्षांपासून दस्तऐवजापासुन वंचित
पत्रकार परिषदेतील माहिती

चांदा ब्लास्ट प्रतिनिधी. अतुल कोल्हे
शहरातील शिवाजी नगर येथीलह५२२ बटे ८ मधील ५२ प्लाटधारकांना ५७ वर्षांचा कालावधी उलटूनही अद्याप प्लाटचा अधिकृत मालकीहक्क मिळालेला नाही. याविषयी अनेकदा निवेदने देऊन व परस्पर संबंधीत अधिकाऱ्यांना भेटुनही अद्याप त्यांना न्याय मिळालेला नाही. विशेष म्हणजे याच नगरातील एका भुखंडांना शासनातर्फे अ वर्ग आखीव पत्रीका मिळालेल्या आहेत मात्र आम्हाला अशा आखीव पत्रीका किंवा सातबारा का मिळालेला नाही हा प्रश्न येथील प्लाटधारकांनी ऊपस्थीत केला आहे.
आम्हा सर्वांना प्लाटचे अ वर्ग आखीव पत्रीका किंवा सातबारा देण्यात यावा अशी मागणी शिवाजी नगर येथील प्लाटधारकांनी पत्रकार परीषदेतुन केली असुन याबाबत न्याय न मिळाल्यास याविरोधात सर्व स्तरावरून आंदोलन करण्याची तयारी या प्लाटधारकांनी घेण्यात आलेल्या पत्रपरिषदेतून केली आहे. १९६३ मध्ये तत्कालीन ग्रामपंचायतीच्या माध्यमातून शिवाजी नगर येथील १७.७५ एकर जिमिनीत प्लाट पाडुन ते ५२ आर्थिक कमकुवत घटकांसाठी देण्यात आले.या सर्व प्लाटधारकांना भुखंडांचे पट्टेही देण्यात आले मात्र या भुखंडाचा सातबारा किंवा अ वर्ग आखीव पत्रीका देण्यात आली नाही. मालकीहक्क नसल्यामुळे या प्लाटधारकांना अनंत अडचणींना सामोरे जावे लागत आहे. मालकीहक्किचे पुरेसे दस्तऐवज मिळविण्यासाठी संबंधित प्लिटधारकांनी अनेकदा निवेदने व पत्रव्यवहार संबंधीत विभागाकडे केला.
मात्र अद्यापपर्यंत त्यांना यात यश आले नाही. दस्तऐवज मिळविण्यासाठी त्यांची ५७ वर्ष खर्ची झाली मात्र अद्यापही त्यांना न्याय मिळालेला नाही. आता या प्लाटधारकांची एक पिढी या लढ्यात संपण्याच्या स्थितीत आहे.मात्र अद्यापही न्याय मिळालेला नाही. त्यामुळे शासनाने त्वरीत येथील नागरिकांना प्लाटचे मालकीहक्क बहाल करावेत अन्यथा याविरोधात आंदोलन उभारण्यात येईल.
असा इशारा शिवाजी नगर येथील संबंधित प्लाटधारकांनी दिला आहे.सदर पत्रपरीषदेला काशीनाथ मनगटे,शेषराव भोयर,पांडुरंग चिडे,रामदास ऊपरे,प्रमोद सत्रमवार,अरविंद भुसारी, सुहास कहुरके,सचनुल राजुरकर, स्मीता खिडे,निकीता कुसराम,विना मग्गीडवार,वंदना मत्ते तथा शिवाजीनगर संघर्ष समितीचे पदाधिकारी व सदस्य ऊपस्थीत होते.