ग्रामीण वार्ताताज्या घडामोडीमहाराष्ट्र
23 जुन रोजी समर्थ कृषी महाविद्यालयात रक्तदान शिबिराचे आयोजन

चांदा ब्लास्ट प्रतिनिधी. प्रा. अशोक डोईफोडे
श्री. गजानन महाराज कृषी व शैक्षणिक अंतर्गत डॉ. पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठ ,अकोला संलग्न समर्थ कृषी महाविद्यालय, देऊळगाव राजा व श्री स्वामी समर्थ ब्लड सेंटर,जालना व राष्ट्रीय सेवा योजना यांच्या संयुक्त विद्यमाने सिंदखेड राजा विधानसभा मतदारसंघाचे आमदार तथा संचालक समर्थ कृषी महाविद्यालय देऊळगाव राजा मा.श्री. मनोजभाऊ कायंदे यांच्या वाढदिवसानिमित्त निमित भव्य रक्तदान शिबिर दिनांक २३ जून २०२५ रोजी सकाळी ९:०० वाजेपासून सुरू होणार आहे.
तरी विद्यार्थ्यांनी या रक्तदान शिबिरामध्ये रक्तदान करावे असे आवाहन
डॉ.नितीन मेहेत्रे
प्राचार्य, समर्थ कृषी महाविद्यालय,दे.राजा, यांनी केले आहे.