ग्रामीण वार्ताताज्या घडामोडीमहाराष्ट्र

अल्ट्राटेक सिमेंट लिमिटेड, माणिकगड मध्ये आंतरराष्ट्रीय योग दिवस साजरा

चांदा ब्लास्ट प्रतिनिधी. प्रा. अशोक डोईफोडे

अल्ट्राटेक सिमेंट लिमिटेड, माणिकगढ,सिमेंट उत्पादना सोबतच आपल्या कार्यस्थळी काम करणाऱ्या कामगार व त्यांच्या परिवाराची सर्व बाजूने काळजी घेत असते.त्यासाठी नेहमी नव नविन उपक्रम राबविण्यात येतात.

आज माणिकगढ सिमेंट येथील ब्लु हॉल मध्ये, खान मंत्रालय यांच्या मार्गदर्शना मध्ये आंतरराष्ट्रीय योग दिवस साजरा करण्यात आला.यावेळेस प्रमुख पाहुणे श्री जी राम RCOM, आयबीएम, नागपूर,श्री अतुल कंसल युनिट हेड माणिकगड सिमेंट,श्री एस के तिवारी माइन्स हेड, मुकेश गहलोत वरिष्ठ उपाध्यक्ष मानव संसाधन,असित परुई टेकनिकॅल हेड यांची प्रमुख उपस्थिती होती.तर एकूण 150 माणिकगढ कॉलोनीतील रहिवाशी यांनी योगा दिवसाचा आनंद घेतला.

आदित्य बिरला पब्लिक शाळा माणिकगढ चे योगा शिक्षक निलेश बोधे याचे द्वारे सर्व उपस्थिताना योगा कारविण्यात आले तर योगा बद्दल मोलाचे मार्गदर्शन सुद्धा करण्यात आलेत.

तसेच योगा नंतर एक पेड मा के नाम नुसार वृक्षारोपण सुद्धा करण्यात आलेत.

यावेळी माणिकगढ चे युनिट हेड अतुल कन्सल यांनी सर्व उपस्थिताल मार्गदर्शन करीत योगा मुळे काय फायदा होतो व त्यापासून आपण आजारानं सुद्धा कसे दूर ठेवू शकतो याबद्दल मार्गदर्शन केलेत.

या योगा दिवसाचे सूत्र संचालन अमित पाठक व अ सक्सेना यांचे द्वारे करण्यात आलेत.

कार्यक्रमाच्या अंतिम टप्प्यात सर्व उपस्थितांना स्वस्थ अल्फाहार वाटप करून कार्यक्रमाची सांगता करण्यात आला.

शेअर करा

Related Articles

Back to top button
कॉपी करू नये