ग्रामीण वार्ताताज्या घडामोडीमहाराष्ट्र

आरोग्य विभागात बायोमेट्रिक हजेरी सक्तीचे करण्यास वैद्यकिय अधिकारी संघटनेचा विरोध

चांदा ब्लास्ट प्रतिनिधी. प्रा. अशोक डोईफोडे

सार्वजनिक आरोग्य विभागात कार्यरत सर्व अधिकारी व कर्मचाऱ्यांचे वेतन 1 एप्रिल पासून बायोमेट्रिक हजेरी नुसार अदा करण्यात यावे, असे आदेश आयुक्त आरोग्य सेवा तथा संचालक, राष्ट्रीय आरोग्य अभियान मुम्बई यांनी 5 मार्च ला काढला आहे, मात्र या निर्णयाचा आरोग्य अधिकारी व कर्मचाऱ्यांनी तीव्र विरोध केला आहे,आरोग्य विभागात वैद्यकीय अधिकारी व कर्मचारी यांना 24 तास सेवा करावी लागते, कामाचे तास निश्चित नाही, मुख्यालयी राहने बंधनकारक नाही, शासनाने आवश्यक मनुष्य बळाची तरतूद केली नाही, असे असतानाही स्वतः ला अलिखित अशा नियमात बांधून घेऊन वर्षानुवर्ष काम करत अत्यावश्यक सेवा देत असलेल्या आरोग्य अधिकारी व कर्मचाऱ्यांवर अविश्वास दाखऊन इतर कुठल्याही अत्यावश्यक विभागात सक्तीची नसलेली बायोमेट्रिक व फेस रिडिंग नुसार हजेरी सक्तीचे करणे चुकीचे वाटत असल्याने या सक्तीचा तीव्र विरोध करत याचा स्वीकार करणार नाही असे निवेदन महाराष्ट्र राज्य राजपत्रित वैद्यकीयअधिकारी गट अ संघटना च्या वतीने उप संचालक आरोग्य सेवा, अकोला, जिल्हा आरोग्यअधिकारी, जिल्हा परिषद, बुलढाणा, जिल्हा शल्य चिकित्सक, बुलडाणा, वैद्यकीय अधिक्षक,उप जिल्हा रुग्णालय, व ग्रामीण रुग्णालय यांना देण्यात आले आहे.

निवेदन देताना संघटनेचे जिल्हा अध्यक्ष ,सचिव, कोषाध्यक्ष, कार्याध्यक्ष, राज्य प्रतिनिधी उपस्थित होते.

शेअर करा

Related Articles

Back to top button
कॉपी करू नये