सांवगी मेघे पोलीसांकडुन अवैधरीत्या दारूची वाहतूक करणाऱ्या ईसमावर कारवाई

चांदा ब्लास्ट प्रतिनिधी. अविनाश नागदेवे
दि. 08/06/2025 रोजी पोलीस स्टेशन सावंगी मेघे पोलीसांना माहिती मिळाली की एक ईसम पांढऱ्या रंगाच्या मोपेड गाडीने सिखबेडा कडून सावंगी कडे जाणारे रोडने देशी दारूची वाहतूक करणार आहे. अशा माहितीवरुन सदर ठिकाणी रवाना होवून नाकेबंदी करून आरोपी नामे नयन रामटेके वय 30 वर्ष रा दृ पुलफैल ता.जि. वर्धा यांचे ताब्यातील पांढऱ्या रंगाच्या अॅसेस मोपेड गाडी ज्यावर नंबर नसलेली चे पायदानावर ठेवून असलेल्या खडर्याचे खोक्याची पाहणी केली असता 1) 5 खडर्याच्या खोक्यामध्ये प्रती खोका 100 देशी दारूने भरलेल्या टॅगो पंच कंपनीच्या 90 एम.एल. च्या एकुण 500 निपा, प्रती निप 100/रू. प्रमाणे 50,000/रू. 2) एक पांढऱ्या रंगाची सुझुकी एसेस मोपेड गाडी नंबर नसलेली जु. वापरती किं. 30,000/रू असा एकुण जु.किं. 80,000/रू. चा माल. अवैधरित्या बिना पासपरवाना वाहतूक करीता असताना पंचासमक्ष मिळून आल्याने पंचासमक्ष मौक्का जप्ती पंचनाम्याप्रमाणे जप्त करून आरोपीत विरूध्द गुन्हा क. 454/2025 कलम 65 अ, ई 77 अ, म. दा.का. सहकलम 3(1), 181, 130/177 मोवाका प्रमाणे गुन्हा नोंद करण्यात आला.
सदरची कार्यवाही ही मा. पोलीस अधीक्षक अनुराग जैन साहेब, अपर पोलीस अधीक्षक सागर कवडे साहेब, उपविभागीय पोलीस अधिकारी प्रमोद मकेश्वर साहेब, यांचे मार्गदर्शनात सहा. पोलीस निरीक्षक श्री संदिप कापडे सा, ठाणेदार पोलीस स्टेशन सावंगी मेघे यांचे निर्देशाप्रमाणे पो.हवा अमोल खाडे, पोहवा सतिष दरवरे, संजय पंचभाई, अनिल वैदय, निखील फुटाणे, अमोल जाधव यांनी केलेली असून गुन्हयाचा पुढील तपास पो.हवा संजय पंचभाई हे करीत आहे.