ग्रामीण वार्ताताज्या घडामोडीमहाराष्ट्र

ईदगाहवर मुस्लिम समाज बांधवांकडून बकरी ईद उत्साहात साजरी

पोलीस प्रशासनाकडून चोख बंदोबस्त

चांदा ब्लास्ट

घुग्घुस (चंद्रपूर) : घुग्घुस शहरातील मुस्लिम कब्रस्थान परिसरातील ईदगाह येथे शनिवार, दिनांक 07 जून 2025 रोजी सकाळी आठ वाजता मुस्लिम समाज बांधवांनी ईद-उल-अजहा (बकरी ईद) निमित्त विशेष नमाज अदा केली. नमाजेनंतर एकमेकांना गळाभेट देत ईदच्या शुभेच्छा दिल्या आणि आपल्या पूर्वजांच्या कबरींवर फुलांची चादर चढवून त्यांचे आशीर्वाद घेतले.

बकरी ईद हा मुस्लिम समाजासाठी अत्यंत श्रद्धेचा आणि महत्त्वाचा सण असून, हजरत इब्राहिम (अ.स.) यांच्या बलिदानाच्या स्मरणार्थ साजरा केला जातो. या दिवशी मुस्लिम बांधव बकरी अथवा शासनाने परवानगी दिलेल्या इतर पशूंची कुर्बानी देतात. हा सण त्याग, समर्पण आणि श्रद्धेचा प्रतीक मानला जातो.

ईदच्या पार्श्वभूमीवर पोलीस प्रशासनाने ईदगाह परिसरात पेंडाल उभारून योग्य बंदोबस्त केला होता. पोलीस उपनिरीक्षक तायवाडे आणि त्यांच्या सहकाऱ्यांनी उपस्थित नागरिकांना गुलाबाचे फुल देत ईदच्या शुभेच्छा दिल्या. शहरात शांतता आणि सुव्यवस्थेसाठी पोलीस कर्मचारी मोठ्या प्रमाणावर तैनात करण्यात आले होते.

घुग्घुसमध्ये बकरी ईद शांततेत, भक्तीभावाने आणि सामाजिक ऐक्य जपत साजरी करण्यात आली.

शेअर करा

Related Articles

Back to top button
कॉपी करू नये