ग्रामीण वार्ताताज्या घडामोडीमहाराष्ट्र
कारागृह येथे बकरी ईदनिमित्त नमाज पठण कार्यक्रम

चांदा ब्लास्ट प्रतिनिधी. अविनाश नागदेवे
वर्धा जिल्हा कारागृह येथे आज रोजी बकरी ईद निमित्त नमाज पठण कार्यक्रम आयोजित करण्यात आलेला होता यावेळी जामा मस्जिद वर्धा येथील मौलवींना आमंत्रित करून त्यांचे द्वारे नमाज पठण करण्यात आलेले आहे. यावेळी 38 मुस्लिम बांधवांनी नमाज पठण केलेले आहे. संपूर्ण कार्यक्रम शांततेत पार पडलेला आहे.
श्री. नितीन क्षीरसागर अधीक्षक, श्री. सुहास नागमोते तुरुंगाधिकारी, श्री. जितेंद्र भावसार तुरुंगाधिकारी श्री संजय वंजारी, श्री. अमित कोठारे श्री शंकर वाघमारे श्री मयूर चंदुरकर श्री संदीप देशमुख श्री. किशोर धोत्रे श्री. रोहित साखरकर उपस्थित होते.
वर्धा जिल्हा कारागृह येथे 5 जून जागतिक पर्यावरण दिनाचे औचित्य साधून अधीकारी, कर्मचारी यांनी मिळून वृक्षरोपण कार्यक्रम करण्यात आला.