चोरी-घरफोडी करणारा सराईत गुन्हेगार व त्याचे 03 साथीदार स्थानिक गुन्हे शाखेच्या जाळ्यात

चांदा ब्लास्ट प्रतिनिधी. अविनाश नागदेवे
सविस्तर असे की, सदर गुन्ह्याचे फिर्यादी हे जालना येथे त्यांचे मुलाकडे गेले होते, काही दिवसानंतर ते त्यांचे राहते घरी टेलिकॉम नगर म्हसाळा वर्धा येथे परत आले असता, त्यांना त्यांचे घराचे कुलूप तुटलेले दिसले, त्यामुळे त्यांनी घराचे आत जावुन पाहणी केली असता, त्यांना एक टि.व्ही., पितळी मुर्ती, तांब्याचे गुंड व इतर सजावटीचे साहित्य मिळुन न आल्याने, ते कोणीतरी अज्ञात चोरट्याने घरी कोणीही नसल्याच्या फायद्या घेत दाराचे कुलूप तोडुन, घराचे आत प्रवेश करून, चोरून नेल्याबाबत दिलेल्या रिपोर्टवरून पो.स्टे. वर्धा शहर येथे अज्ञात चोरट्याविरूध्द अप क्र. 866/2025 कलम 305(a), 331(3)(4), 3(5) भा.न्या.सं.अन्वये गुन्हा नोंद करण्यात आला होता, सदर गुन्ह्याचा समांतर तपास स्था.गु.शा. वर्धा चे पथक करीत होते. दि. 06/06/2025 रोजी तपासदरम्यान त्यांना मिळालेल्या गोपणीय माहितीवरून आरोपी नामे शाहिद शाकीर खान पठान, वय 18 वर्ष, रा. मिलींदनगर म्हसाळा वर्धा यास त्याचे राहते घरी जावुन चेक केले असता, त्याचे घरी सदर गुन्ह्यातील चोरीस गेलेला संपुर्ण मुद्देमाल मिळुन आल्याने, त्यास सखोल विचारपुस केली असता, त्याने स्वतः व त्याचा मामा सराईत गुन्हेगार अरबाज सत्तार खान पठान, वय 23 वर्ष, रा. तळेगाव (टा.) तह.जि. वर्धा व त्याचा मित्र प्रज्वल किसना हुके, वय 23 वर्ष, रा. आनंदनगर पुलफैल वर्धा व एक अल्पवयीन साथीदार यांनी मिळुन सदरचा गुन्हा केल्याचे कबुल केल्याने, त्यांचे ताब्यातुन सदर गुन्ह्यातील चोरीस गेलेला संपुर्ण मुद्देमाल जप्त करण्यात आला.
तसेच आरोपी शाहिद पठान याने त्याचा मित्र प्रज्वल हुके व अल्पवयीन साथीदार यांनी मिळुन वायगाव (नि.) येथील एका बंद दुकानातुन नगदी रक्कम चोरी केली असुन, त्याबाबत पो.स्टे. देवळी येथील अप क्र. 290/25 कलम कलम 305(a) भा.न्या.सं. अन्वये गुन्हा नोंद असुन, त्या गुन्ह्यातील चोरीस गेलेल्या नगदी 8,000 रू पैकी 5,000 रू जप्त करण्यात आले असुन, उर्वरित 3,000 रू आरोपीतांनी खर्च केल्याचे सांगितले. तसेच यातील आरोपी अरबाज पठान हा सराईत गुन्हेगार असुन, त्याने यापुर्वी पो.स्टे. देवळी येथील अप क्र. 179/2024 कलम 379 भा.द.वी., पो.स्टे. कारंजा येथील अप क्र. 74/24 कलम 379 भा.द.वी., पो.स्टे. अल्लीपुर येथील अप क्र. 01/24 कलम 379 भा.द.वी. अन्वये ईलेक्ट्रिक पोल चोरीचे गुन्हे केले असुन, त्या गुन्ह्याचे घटना ता. पासुन तो फरार पाहिजे आरोपी होता. अशा प्रकारे पोलीसांनी 03 आरोपी व 01 अल्पवयीन यांचे ताब्यातुन पो.स्टे. वर्धा शहर व देवळी चे गुन्ह्यातील चोरीस गेलेला मुद्देमाल व आरोपीतांनी गुन्ह्यात वापरलेली मोपेड असा जु.कि. 1,23,000 रू. चा मुद्देमाल दोन गुन्हे उघडकीस आणुन, तीन गुन्ह्यातील पाहिजे पसार आरोपीस निष्पन्न करून, पुढील तपासकामी पो.स्टे. वर्धा शहर यांचे स्वाधीन करण्यात आले आहे
सदरची कार्यवाही पोलीस अधिक्षक मा. श्री. अनुराग जैन सा., अपर पोलीस अधिक्षक मा. श्री. डॉ. सागर कवडे सा., यांचे मार्गदर्शनात स्थानिक गुन्हे शाखा जि. वर्धा चे पोलीस निरीक्षक मा.श्री. विनोद चौधरी सा. यांचे निर्देशाप्रमाणे, पो.उपनि. बालाजी लालपालवाले, पो.अं. मनोज धात्रक, अरविंद येनुरकर, गजानन दरने, रवि पुरोहित, विनोद कापसे, राहुल लुटे सर्व नेमणुक स्थानिक गुन्हे शाखा वर्धा यांनी केली.