ग्रामीण वार्ताताज्या घडामोडीमहाराष्ट्र

देऊळगाव राजा येथे विश्व पर्यावरण दिनानिमित्ताने कार्यशाळेचे आयोजन

समर्थ कृषी महाविद्यालय व भारतीय जैन संघटनेचा पुढाकार

चांदा ब्लास्ट प्रतिनिधी. प्रा. अशोक डोईफोडे

जागतिक विश्व पर्यावरण दिनाचे निमित्ताने समर्थ कृषी महाविद्यालय व भारतीय संघटना शाखा देऊळगाव राजा यांच्या संयुक्त विद्यमाने एक दिवसीय कार्यशाळेचे आयोजन संस्थेच्या महाविद्यालयात दिनांक 5जून रोजी सकाळी 11 वाजता करण्यात आले असून पर्यावरणाचा बीघडत चाललेला समतोल, पर्यावरण संवर्धन बाबत घ्यावयाची काळजी उपायोजना बाबत सखोल मार्गदर्शन महाविद्यालयाचे प्राचार्य नितीन मेहेत्रे करणार आहेत कार्यशाळेचे उद्घाटन संस्थेच्या अध्यक्षा श्रीमती नंदाताई देवानंद कायंदे यांच्या हस्ते करण्यात येणार आहे तर प्रमुख उपस्थिती बी जे एस चे सन्मती जैन, पियूष खडकपूरकर, सतेज डोणगावकर महाविद्यालयाचे प्राचार्य नितीन मेहेत्रे व सचिन सोळंके यांची लाभणार आहे वृक्ष लागवड महत्त्वाची नसून वृक्ष संगोपन ही काळजी गरज आहे.

शेअर करा

Related Articles

Back to top button
कॉपी करू नये