दयानंद राठोड यांच्या वाढदिवसानिमित्त आरोग्य तपासणी शिबिराचे आयोजन
आरोग्य शिबिरे ही काळाची गरज

चांदा ब्लास्ट प्रतिनिधी. संतोष इंद्राळे
आधुनिक तंत्रज्ञानाच्या युगामध्ये आरोग्य सुविधा दिवसेंदिवस महागडी सेवा होत चालली आहे. त्यामुळे सर्वसामान्य रुग्णांना आपल्या आरोग्य समस्यांवर उपचार करून घेणे परवडत नाही. अनेक रुग्ण आजारपण आपल्या अंगावर काढतात. यासाठी सर्वसामान्य रुग्णांची तपासणी करने गरजेचे आहे. त्यामुळे आजारपणाचे निदान होऊन डॉक्टरांना उपचार करणे शक्य होते.
याच सकारात्मक दृष्टिकोनातून सामाजिक बांधिलकी जोपासविण्याचे काम दयानंद राठोड यांच्या सहकार्यातून त्यांच्या वाढदिवसानिमित्त मालगुडा येथे मोफत आरोग्य तपासणी शिबिराचे आयोजन करण्यात आले होते. या शिबिरात मोठ्या संख्येने नागरिकांनी सहभाग घेतला. आपण समाजाचे काहीतरी देणे लागतो या भावनेतून आम्ही आमचे कर्तव्य पार पाडले असल्याचे प्रतिपादन दयानंद राठोड यांनी यावेळी केले.