नेटवर्कअभावी ११ वीचे ऑनलाईन प्रवेश रखडले

चांदा ब्लास्ट प्रतिनिधी.संतोष इंद्राळे
जिवती :- तालुक्यात बीएसएनएल नेटवर्क अभावी सर्व अकरावीच्या विद्यार्थ्यांचे ऑनलाइन प्रवेश प्रक्रिया रखडली आहे. बीएसएनएल नेटवर्क गेल्या पाच दिवसापासून बंद असल्यामुळे अकरावी ऑनलाइन प्रवेश प्रक्रिया विद्यार्थ्यांची पूर्ण होऊ शकली नाही त्यामुळे संपूर्ण तालुक्यातील विद्यार्थ्यांची तारांबळ उडाली असून. विद्यार्थ्यांना अकरावी मध्ये प्रवेश मिळेल की नाही? अशी चिंता त्यांचे पालक व विद्यार्थ्यांना पडलेली आहे.
तसेच इतर नेटवर्कची सुविधा उपलब्ध नसल्यामुळे बँकेतील कामे, पंचायत समिती,तहसील मधील विद्यार्थ्यांचे उत्पन्न दाखले व इतरही दाखले तसेच पंचायत समितीमधील ऑनलाइन जन्म नोंद मृत्यू प्रमाणपत्र यांच्यासाठी विद्यार्थ्यांना ताटकळत बसावे लागत आहे व गेल्या पाच दिवसापासून नेटवर्क अभावी तहसील, पंचायत समिती, बँका ऑनलाईन शेतकऱ्यांची व विद्यार्थ्यांची कामे, ऐन पेरणीच्या तोंडावर शेतीचे मसागतीचे कामे सोडून कार्यालयात चकरा माराव्या लागत आहे. त्याचा फटका सर्वसामान्य गरीब शेतकरी व विद्यार्थ्यांना मोठ्या प्रमाणात होत आहे व पाच दिवसापासून त्यांच्या चकरा सतत कार्यालयात होत असल्याने आर्थिक भूृदंड ही सोसावा लागत आहे तसेच अनेक बँकेत शेतकरी विद्यार्थी, वयोवृद्ध, निराधार व इतरही कर्मचाऱ्यांना वाट बघत बसावे लागत आहे त्यामुळे या संदर्भातली माहिती बीएसएनएलचे वरिष्ठ अधिकारी यांना फोन द्वारे संपर्क केला असता दखल घेत नसल्याने बीएसएनएलचे टावर ही शोभेची वस्तू बनले असल्याची चर्चा तालुक्यातील नागरिकाकडून बोलले जात आहे.
बीएसएनएल बीएसएनएल चे वरिष्ठ अधिकारी नेटवर्कची व्यवस्था सुरळीत करतील काय? याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे व नेटवर्कची सुविधा तात्काळ सुरू करावी असे पत्र बीएसएनएलचे मुख्य प्रबंधक यांना निवेदनाद्वारे श्री सुग्रीव गोतावळे यांनी दिले आहे.