खून करणाऱ्या आरोपीला आजीवन कारावास

चांदा ब्लास्ट प्रतिनिधी. अविनाश नागदेवे
अपराध नंबर 02/2022 कलम 302,294,506,34 भादवी फिर्यादी -किरण विष्णू घोडमारे रा.वायगाव घटना तारीख 01/01/ 2022 चे 19/00 दाखल तारीख 02/01/2022 आरोपी 1)सदगीर सिंग रुक सिंग खिच्ची 2)बबलू सिंग बल्लू सिंग भादा 3)करण सिंग संतोष सिंग बावरी 4)राजकुमार वेतन सिंग बावरी सर्व राहणार गिट्टीखदान शीख बेडा सावंगी मेघे यातील आरोपी 1) सदगीर सिंग रुक सिंग खिच्ची 2)बबलू सिंग बल्लू सिंग भादा 3)करण सिंग संतोष सिंग बावरी यांनी मौजा वायगाव निपाणी येथील फिर्यादी यांचे घरासमोरील गणेश त्रंबके यांचे अंड्याचे बंडी वर येऊन अंड्याचे पैशाचे देण्याचे कारणावरून वाद करून शिवीगाळ करीत असताना फिर्यादीचे आईने आरोपी त्यांना टोकले असता सदर आरोपी हे फिर्यादीचे आईकडे येत असताना फिर्यादीचा मोठा भाऊ मृतकनामे चेतन घोडमारे यांनी म्हटले की,
तुम्ही येथे तमाशा कशाला करता तुम्ही येथून निघून जा असे म्हटल्यावरून आरोपी सदगीर सिंग खिच्ची यांनी त्याची हातात असलेल्या धारदार गुप्तिने फिर्यादीचे मोठे भाऊ मृतकच्या छातीत उजव्या बाजूला गुप्ती मारून जीवानिशी ठार केले तसेच हत्याराचा धाक दाखवून राजकुमार बावरी यांचे नावाचा उल्लेख करून धमकी देत पळून गेले घटनेनंतर फिर्यादी यांना राजकुमार बाहुली यांनी अश्लील भाषेत शिवीगाळ करून पाहून घेण्याची धमकी दिली असे फिर्यादीचे तोंडी रिपोर्ट वरून सदरचा गुन्हा नोंद करून तपासात घेण्यात आला होता
सदर गुन्ह्यातील आरोपी यांना दिनांक 02/01/2022 चे 00/05 वाजता अटक करण्यात आली होती.
सदर गुन्ह्याचा तपास पोलिस अधीक्षक प्रशांत होळकर पोलीस उपअधीक्षक यशवंत सोळंकी पोलीस उपअधीक्षक चंद्रकांत पाटील पोलिस निरीक्षक तिरुपती राणे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक नंदकिशोर खेकाडे व त्यांचे रायटर पोलीस शिपाई मनोज नप्ते यांनी गुन्ह्याचा तपास पूर्ण करून सदर आरोपी विरुद्ध दोषारोप क्रमांक 73/22 दिनांक 26/03/2022 रोजी मा. न्यायालयात दाखल केले सदर केस बोर्डावर येतात कोर्ट पैरवी महिला पोहवा भारती कारंडे यांनी योग्यरीत्या कोर्ट पैरवी केल्याने मा. न्यायालयांनी सदबीर सिंग खिची यांना आजीवन कारावास व दहा हजार रुपये दंड व दंड न भरल्यास एक वर्ष सक्षम कारावास तसेच आरोपी राजकुमार बेतांसिंग बावरी यांना सहा महिने सश्रम कारावास एक हजार रुपये दंड अशी शिक्षा दिली आहे.