ग्रामीण वार्ताताज्या घडामोडीमहाराष्ट्र

राजमाता अहिल्याबाई होळकर यांनी समाजाच्या प्रगतीसाठी केलेले कार्य म्हणजे लोकनेतृत्व – आ. जोरगेवार.

आ. जोरगेवार यांच्या कार्यालयात राजमाता अहिल्याबाई होळकर जयंती कार्यक्रम

चांदा ब्लास्ट

राजमाता अहिल्याबाई होळकर यांच्या कार्यकाळात समाजातील सर्व घटकांना समान न्याय आणि संधी देण्याचा त्यांनी नेहमीच प्रयत्न केला. त्यामुळेच अहिल्यादेवींचे नाव आजही आदराने घेतले जाते. त्यांनी दिलेल्या शिकवणीमुळे आपल्याला समाजहितासाठी कार्य करण्याची स्फूर्ती मिळते. त्यांनी प्रत्येक संकटाला धैर्याने तोंड दिले आणि निर्णय घेतांना नेहमीच लोकहिताचे भान ठेवले. राजमाता अहिल्याबाई होळकर यांनी समाजाच्या प्रगतीसाठी केलेले कार्य म्हणजे लोकनेतृत्व होते असे प्रतिपादन आमदार किशोर जोरगेवार यांनी केले.

आमदार किशोर जोरगेवार यांच्या जनसंपर्क कार्यालयात राजमाता अहिल्याबाई होळकर यांच्या जयंतीनिमित्त कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी ते बोलत होते. या प्रसंगी भारतीय जनता पक्षाचे नवनियुक्त जिल्हा महानगर अध्यक्ष सुभाष कासनगोट्टूवार, माजी शहर अध्यक्ष दशरथ सिंह ठाकूर, बलराम शाहा, विकास खटी, संजय तिवारी, विश्वजीत शहा, संजय सिंग, वंदना हातगावकर, सलीम शेख, सरोज चांदेकर, शालू कंदोजवार, विनोद अनंतवार, संजय महाकालीवार, बब्बलू मेश्राम, मंगेश अहिरकर, दत्तू गवळी, बब्बलू मेश्राम आदींची उपस्थिती होती.

यावेळी पुढे बोलताना आ. जोरगेवार म्हणाले की, अहिल्यादेवींचे जीवन कार्य, त्यांची कर्तृत्व शैली, समाजासाठी त्यांनी उभारलेले आदर्श हे आजच्या पिढीसाठी नेहमीच प्रेरणादायी आहेत. त्यांनी आपल्या राज्यात न्याय, नीतिमत्ता आणि सर्वसामान्यांचा कल्याण हेच सर्वोच्च तत्व मानले. राजमाता अहिल्याबाई होळकर यांचे जीवन धर्म, न्याय आणि जनकल्याण यांच्या त्रिसूत्रीवर आधारलेले होते. त्यांनी आपल्या राज्याची घडी बसवताना प्रत्येक घटकाला न्याय दिला, धर्माच्या सन्मानासाठी काम केले आणि जनतेच्या कल्याणासाठी अहोरात्र झटले. त्यांची ही त्रिसूत्री आजही समाजहितासाठी गरजेची आहे.

यंदा महाराष्ट्र शासनाने अहिल्याबाई होळकर जयंती मोठ्या प्रमाणात साजरी करण्याचा निर्णय घेतला आहे. हा निर्णय स्वागतार्ह असल्याचे त्यांनी यावेळी सांगितले. या कार्यक्रमात आमदार किशोर जोरगेवार यांच्यासह भारतीय जनता पक्षाच्या पदाधिकाऱ्यांनी राजमाता अहिल्यादेवी होळकर यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून त्यांना अभिवादन केले.

शेअर करा

Related Articles

Back to top button
कॉपी करू नये