ग्रामीण वार्ताताज्या घडामोडीमहाराष्ट्र

सामुदायिक ध्यान – प्रार्थना म्हणजेच माणूस घडवण्याचा कारखाना – देवराव भोंगळे 

चांदा ब्लास्ट प्रतिनिधी. प्रा. अशोक डोईफोडे

गावात राहणारा ग्रामनाथ आणि ग्रामोन्नतीचा वस्तुपाठच वंदनीय राष्ट्रसंतांनी ग्रामगीतेच्या माध्यमातून घालून दिला आहे. त्यांची जयंती आपण मोठ्या उत्साहात ग्रामजयंती म्हणून साजरी करत आहोत, हे संस्मरणीय आहे. त्यातच याठिकाणी राष्ट्रसंतांच्या नावे सभागृह लोकार्पित होत आहे. याचाही विशेष आनंद आहे. असं म्हणतात, जगात माणुस घडविण्याचा कारखाना कुठे आहे तर ते गुरूदेव सेवा मंडळाचे सामुदायिक ध्यान-प्रार्थना केंद्र आहे. आणि या सभागृहाच्या माध्यमातून तेच मानवतावादी कार्य होणार आहे. त्यासाठी मनःपूर्वक शुभेच्छा असे मनोगत कढोली (खुर्द) येथील सभागृह लोकार्पण कार्यक्रमात व्यक्त केले.

कोरपना तालुक्यातील मौजा कढोली खुर्द येथे ब्रम्हलीन वंदनीय राष्ट्रसंत तुकडोजी महाराज जयंती महोत्सव तथा सभागृहाच्या लोकार्पण सोहळ्यास आमदार देवराव भोंगळे उपस्थित होते.

यावेळी मंचावर माझ्यासमवेत भाजपचे जिल्हा महामंत्री विवेक बोढे, गुरूदेव सेवा मंडळाचे ॲड. राजेंद्र जेनेकर, राजुरा नगरपरिषदेचे माजी उपाध्यक्ष सुनील देशपांडे, आशिष ताजने, बापुराव मडावी, उपसरपंच विनायक डोहे, संजय लोहे, बबनराव चंदनकर, गणेश देरकर, सुदाम लांडे, प्रमोद वराडे, निखिल भोंगळे, दशरथ अवताडे, विठ्ठल जुनघरी, भाऊराव थेरे, प्रमोद लंगडे, गणेश लंगडे, गोपाल लांडे आदिंची प्रामुख्याने उपस्थिती होती.

शेअर करा

Related Articles

Back to top button
कॉपी करू नये