ग्रामीण वार्ताताज्या घडामोडीमहाराष्ट्र
जुमडा येथे मृतदेह आढळला

चांदा ब्लास्ट प्रतिनिधी. प्रा. अशोक डोईफोडे
तालुक्यांतील जुमडा येथील सतीश बाबासाहेब शिंदे यांच्या शेताजवळ त्याच गावातील जनार्धन तुकाराम मुख्यदल, वय 65 वर्ष मृत अवस्थेत 23 मे रोजी सकाळी साडे सहा वाजता आढळले. सविस्तर वृत्त असे की ,मृतक हे त्यांचे घरुन गावातील दुकानामध्ये बिड्या आणन्याकरीता गेले होते व रात्रीपासुन सकाळपर्यंत घरी परत गेले नाही.
दुसऱ्या दिवशी त्याच गावातील सतिश शिंदे यांच्या शेताजवळ मृतक जर्नाधन तुकाराम मुख्यदल, वय अं.65 वर्षे, रा. जुमडा हे मृत अवस्थेत मिळुन आले, घटनेची माहिती पोलिस ठाण्यात सोजेश सुभाष मुख्यदल यांनी दिली, पोलिसांनी मर्ग दाखल केला असुन पुढील तपास पोहेकॉ. डिघोळे करीत आहे.