ग्रामीण वार्ताताज्या घडामोडीमहाराष्ट्र

शेतात विषारी औषध प्राशन करून युवकाची आत्महत्या 

चांदा ब्लास्ट प्रतिनिधी. प्रा. अशोक डोईफोडे

 दिपक रामभाउ मंडपे वय 24 वर्ष रा गिरोली बु ता देउळगांवराजा जि बुलडाणा यांने दिनांक 12 ऑक्टोंबर रोजी दुपारी तीन वाजता स्वतच्या शेत गट नं 206 शिवार गिरोली बु.मध्ये अनोळखी विषारी औषध सेवन केल्याने त्यास उपचार साठी शिंदे हास्पीटल देउळगांवराजा येथे भरती केले.

तेथुन त्यास पुढील उपचार साठी घाटी दवाखाना छत्रपती संभाजीनगर येथे भरती केले असता तो दिनांक 13 ऑक्टोंबर रोजी दुपारी 12/25 वा दरम्यान इलाज सुरु असतांना मरण पावला . देऊळगाव राजा पोलिस ठाण्यात मर्ग दाखल करण्यात आला असून पुढील तपास पोलीस निरीक्षक संतोष महल्ये यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस हेड कॉन्स्टेबल रवींद्र चव्हाण करीत आहे.

शेअर करा

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
कॉपी करू नये