ग्रामीण वार्ताताज्या घडामोडीमहाराष्ट्र

“ईद मिलाद उन – नबी” निमित्त वरोऱ्यात ‘जुलूस’

मुस्लिम बांधवांचा सण उत्साहात साजरा करण्यात आला

चांदा ब्लास्ट प्रतिनिधी. राजेंद्र मर्दाने

वरोरा – मुस्लिम धर्माचे प्रेषित मुहम्मद पैगंबर यांच्या जयंतीनिमित्त आज गुरुवारी सकाळी शहरात भव्य जुलूस काढून “ईद मिलाद – उन – नबी” सण उत्साहात साजरा करण्यात आला.

      डॉ. बाबासाहेब आंबेडकर चौकातील दरगाह परिसरातून जुलूस चा प्रारंभ झाला. कासमपंजा वार्ड, स्वातंत्र्यवीर सावरकर चौक, डोंगरवार चौक, मित्र चौक, आझाद वार्ड, जत्रा चौक, कॉलरी वार्ड, फिश मार्केट जवळील मुस्लिम समाज भवनात पोहचला. परत नेहरू चौक मार्गे डॉ आंबेडकर चौकात समारोप करण्यात आला. यावेळी तमाम मुस्लिम बांधवानी ” ईद मिलाद उन – नबी ” च्या गळाभेटी घेऊन सामाजिक ऐक्य जोपासत एकमेकांना शुभेच्छा दिल्यात. ठिक ठिकाणी सामाजिक संघटना व राजकीय पक्षाचे पदाधिकारी यांच्या वतीने ‘जुलूस’ चे स्वागत करण्यात आले. या अनुषंगाने वरोरा शहरात “ईद मिलाद – उन- नबी” निमित्ताने मुस्लिम बांधवांच्या अनेक संघटनांनी सहभाग नोंदविला.

     यावर्षी एकाच दिवशी आलेल्या गणेश विसर्जन व ईद मिलाद – उन – नबी हे दोन्ही उत्सवाच्या पार्श्वभूमीवर दोन्ही समाजातील लोकांनी कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न लक्षात घेण्याचे सामंजस्य दाखविले. आज सर्वांच्या सहकार्याने “ईद मिलाद उन नबी” उत्साहात साजरा करण्यात आला.

      ‘जुलूस’ यशस्वीतेसाठी जश्ने ईद मिलादुन्नबी शहर कमेटी, मुस्लिम संघर्ष समिती, शेरेहिंद कमेटी, काजी मोहल्ला कमेटी, आझाद वार्ड, कमेटी., कॉलरी वार्ड कमेटी, रेल्वे स्टेशन कमेटी,कासमपंजा कमेटी, शहरातील मुस्लिम बांधवानी परिश्रम घेतले. यावेळी पोलिसांचे विशेष सहकार्य लाभले.

शेअर करा

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
कॉपी करू नये