ग्रामीण वार्ताताज्या घडामोडीमहाराष्ट्र

देऊळगाव राजा शहरात 70 कोटी रुपयांच्या विकास कामाचे भूमिपूजन संपन्न

चांदा ब्लास्ट प्रतिनिधी. अशोक डोईफोडे

देऊळगाव राजा शहरात 70 कोटी रुपयांच्या विकास कामाचे भूमिपूजन व लोकार्पण आमदार डॉ राजेंद्र शिंगणे यांच्या हस्ते खासदार प्रतापराव जाधव यांच्या अध्यक्षतेखाली झाले.

भगवानबाबा नगर येथे तयार झालेल्या सिमेंट काँक्रीट रस्त्याचे लोकार्पण सोहळा स्वामी समर्थ मंदिरात पार पडला.

महात्मा फुले चौकात नगर परिषद सार्वजनिक वाचनालया च्या नवीन सुसज्ज इमारती चे भूमिपूजन करण्यात आले.

तहसील कार्यालया समोरील जागेत तयार होणाऱ्या महसूल भवन इमारती चे भूमिपूजन आमदार डॉ राजेंद्र शिंगणे यांच्या हस्ते खासदार प्रतापराव जाधव यांच्या अध्यक्षतेखाली पार पडले, याप्रसंगी वृक्षारोपण सुद्धा करण्यात आले

कार्यक्रमात प्रमुख पाहुणे म्हणून माजी आमदार शशिकांत खेडेकर, तोतारामजी कायंदे,राष्ट्रवादी काँग्रेसचे जिल्हा अध्यक्ष नाझीर काझी,माजी नगर परिषद अध्यक्ष शांतीलाल सिंगलकर,संतोष खांडेभराड,कविष जिंतूरकर, सरस्वती टेकाळे, पूजा खांडेभराड,दीपक बोरकर,प्रवीण धनावत,अनिल चित्ते,शंकर तलबे, गोपाल व्यास,राजीव सिरसाट, उपविभागीय अधिकारी समाधान गायकवाड, तहसीलदार वैशाली डोंगरजाळ, मुख्याधिकारी अरुण मोकळ,उपविभागीय अभियंता काबरे, तथा इतर उपस्थित होते, खासदार प्रतापराव जाधव यांनी आपल्या अध्यक्षीय भाषणात केंद्रात व राज्यात महायुती चे सरकार असल्याने प्रथमच एवढा मोठा करोडो रुपये चा विकास निधी उपलब्ध झाला आहे, जिल्ह्यात 500 किलोमीटर चे सिमेंटचे रस्ते झाले असून,जलजीवन मिशन योजनेअंतर्गत शुद्ध पाणी पिण्यासाठी मिळणार आहे, समृद्धी महामार्ग मूळे विविध प्रकारचे प्रकल्प सुरू होणार असल्याचे सांगितले.

आमदार डॉ. राजेंद्र शिंगणे यांनी राज्यात धडाडीचे निर्णय घेणारे,समविचारी नेते असल्याने राज्याचा विकासरथ वेगाने जात आहे, सिंदखेडराजा मतदारसंघात करोडो रुपये चा विकास निधी मंजूर करण्यात आला आहे, देऊळगाव राजा शहरातील पिण्याच्या पाण्याचा प्रश्न निकालात निघाला आहे, महसूल भवन च्या निर्मिती मुळे सर्व शासकीय कार्यालये एकाच ठिकाणी राहणार आहे त्यामुळे नागरिकांची होणारी पायपीट थांबणार आहे, येणाऱ्या निवडणुकीत महायुती ला मतदान करण्याचे आवाहन केले, माजी आमदार शशिकांत खेडेकर व तोताराम कायंदे यांनी मार्गदर्शन केले, कार्यक्रमाचे प्रास्ताविक ऍड अर्पित मिनासे यांनी केले, संचालन अर्जुन आंधळे यांनी केले तर आभार प्रदर्शन मुख्याधिकारी अरुण मोकळ यांनी केले, कार्यक्रमात भाजप, शिवसेना, व राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते कार्यकर्ते उपस्थित होते.

शेअर करा

Related Articles

Back to top button
कॉपी करू नये