भद्रावतीत अज्ञात इसमांकडून चार चाकी वाहनाची तोडफोड

चांदा ब्लास्ट प्रतिनिधी. अतुल कोल्हे
घरासमोर ठेवलेल्या थार या चारचाकी वाहनाची अज्ञात तीन इसमान कडून तोडफोड करण्यात आल्याची घटना दिनांक 14 ला शहरातील चंद्रपूर नागपूर हायवेवरील टप्पा परिसरात घडली.
तोडफोडीचा घटनाक्रम cctv कॅमेरात कैद झाला असून या घटनेची तक्रार भद्रावती पोलिसात करण्यात आली आहे. वासुदेव ठाकरे हे खाजगी कामानिमित्त यवतमाळवरून घरी आपल्या कुटुंबासह परतल्यानंतर त्यांनी महेंद्र कंपनीचे थार हे एम एच 34 cd 83 31 हे चार चाकी वाहन घरासमोर ठेवले. रात्रोला तोडफोडी चा आवाज आल्यानंतर त्यांनी खिडकीतून बाहेर पाहिले असता अज्ञात तीन इसम हे लाकडी दांडक्यासह गाडीची तोडफोड करताना दिसले. आरडाओरड झाल्यानंतर हे तिन्ही इसम एका कारमध्ये बसून चंद्रपूरच्या दिशेने पळाले.
या घटनेत वासुदेव ठाकरे यांचे जवळपास 50 हजार रुपयांचे नुकसान झाले आहे. सदर घटनेची तक्रार वासुदेव ठाकरे यांनी भद्रावती पोलिसात केल्यानंतर पोलिसांनी अज्ञात तीन इसमानविरुद्ध गुन्हा दाखल केला असून ते या अज्ञात आरोपींचा शोध घेत आहे.