Entertainmentग्रामीण वार्ताताज्या घडामोडीदेश विदेशमहाराष्ट्र

आंतरराष्ट्रीय जीन रिफ्लेक्झोलॉजी दिनानिमित्य चंद्रपूर येथे चर्चासत्र संपन्न

स्थानकवासी जैन श्रावक संघाने केले आयोजन

चांदा ब्लास्ट तालुका प्रतिनिधी

आशिष रैच, राजुरा

आजारपण, मानवी जीवनात वारंवार उद्भवणारा प्रसंग. ह्या आजारपणामुळे मानवाची शारीरिक, आर्थिक तसेच मानसिक हानी होते. आजारपण उद्भवल्यास आपण वैद्यकीय उपचार घेतो त्याऐवजी जर आजार आपल्या आयुष्यात येऊच नये हे उद्दिष्ट ठेऊन ते पूर्ण करण्यासाठी, आंतरराष्ट्रीय जिन रिफ्लेक्सोलॉजी असोसिएशन दरवर्षी १ जून हा दिवस ‘जिन रिफ्लेक्सोलॉजी दिन’ म्हणून साजरा करते.

या दिवसापासून ते आंतरराष्ट्रीय योग दिनापर्यंत, आरोग्य जागरूकतेसाठी विविध कार्यक्रम आयोजित केले जातात. या मालिकेत, यावर्षी १ जून ते २१ जून या कालावधीत ७ राज्यांमध्ये २१ दिवसांत २२ शहरांमध्ये २३ आरोग्य जागरूकता चर्चासत्रे आयोजित केली जात आहेत. या मालिकेचे उद्घाटन १ जून रोजी दिल्लीतील महावीर इंटरनॅशनल शाहदरा सेंटरद्वारे करण्यात आले आणि २९ जून रोजी चेन्नई येथे समारोप होणार असून चंद्रपूर येथेही जैन श्रावक संघाने आंतरराष्ट्रीय रिफ्लेक्सोलॉजी जीन असोसिएशनच्या सहकार्याने चर्चासत्राचे आयोजन स्थानिक जैन भवन येथे केले होते.

हजारो रुग्णांवर केलेल्या संशोधनानंतर असा निष्कर्ष काढण्यात आला आहे की हृदयविकाराचा झटका, किडनी फेल्युअर, स्पॉन्डिलायटिस, पार्किन्सन यासारख्या सर्व प्रमुख आजारांचे मूळ हे अव्यवस्थित जीवनशैली आहे. म्हणूनच या चर्चासत्रांचे आयोजन करून नागरिकांना जागरूक केले जात आहे. रिफ्लेक्सोलॉजी, निरोगी जीवनशैली, अ‍ॅक्युप्रेशर इत्यादींद्वारे जीवनात बदल घडवून आणणाऱ्या घटकांची माहिती संगणकीकृत पॉवर प्रेझेंटेशनद्वारे जिरी अनिल जैन, जिरी हर्षित जैन तसेच जिरी ऋषभ जैन ह्यांच्याद्वारे देण्यात आली तसेच शंकांचे निरसनही केले गेले.

 *तुम्ही ऑनलाईनही लाभ घेऊ शकता* 

संयोजक जिरी अनिल जैन म्हणाले की, जास्तीत जास्त नागरिकांनी त्यांच्या शहरात आयोजित केलेल्या मोफत सेमिनारमध्ये सहभागी व्हावे आणि त्यांचा लाभ घ्यावा. ज्यांना थेट सहभागी होता येत नाही त्यांच्यासाठी हा सेमिनार ‘जिन रिफ्लेक्सोलॉजी’ या युट्यूब चॅनेलवर देखील उपलब्ध असेल. सर्व माहितीसाठी तुम्ही खालील लिंकला भेट देऊ शकता: www.jinreflexology.in/jin-day25/

कार्यक्रमाच्या सफल आयोजनासाठी चंद्रपूर येथिल वर्धमान स्थानकवासी जैन श्रावक संघाचे अध्यक्ष योगेश भंडारी, उपाध्यक्ष तुषार डगली, सचिव अमित बैद दीपक पारक, प्रशांत बैद, त्रिशूल बम, ह्यांचेसह जैन समाजातील मान्यवरांनी परिश्रम घेतले.

शेअर करा

Related Articles

Back to top button
कॉपी करू नये