सावली नगरपंचायत नगराध्यक्ष पदी साधनाताई वाढई यांची अविरोध निवड

चांदा ब्लास्ट प्रतिनिधी. डॉ. शेखर प्यारमवार
सावली – दिनांक २२/०५/२०२५ ला सावली नगरपंचायत नगराध्यक्ष पदी साधनाताई वाढई यांची एकमताने निवड करण्यात आली.
मावळते नगराध्यक्षा लताताई लाकडे यांनी राजीनामा दिल्यानंतर रिक्त झालेल्या नगराध्यक्ष पदासाठी काँग्रेस पक्षाकडून एकमेव अर्ज नगरसेविका साधनाताई वाढई यांचा असल्याने आणि काँग्रेस पक्षाकडे कडे बहुमत असल्याने त्यांची बिनविरोध निवड करण्यात आली.
विधिमंडळ पक्षनेते महाराष्ट्र विधानसभा तथा ब्रम्हपुरी – सावली विधानसभा मतदार संघाचे आमदार विजय भाऊ वडेट्टीवार यांच्या नेतृत्वात मागील झालेल्या सावली नगरपंचायत निवडणुकीत काँग्रेस पक्षाचे १७ पैकी १४ नगरसेवक निवडून येऊन बहुमताचा आकडा पार केला, नगराध्यक्ष पद हे सर्वसाधारण महिला राखीव असल्याने लताताई लाकडे अडीच वर्षा करीता नगराध्यक्षा झाल्या त्यांच्या राजीनाम्यानंतर सावली नगरपंचायत नगराध्यक्ष पदी साधनाताई वाढई यांची अविरोध निवड करण्यात आली.
साधनाताई वाढई दोनदा ग्रामपंचायत सदस्य आणि सलग दुसऱ्यांदा नगरसेविका म्हणून निवडून आल्या, एक अनुभवी नगरसेविका म्हणून साधनाताई वाढई यांची अविरोध निवड झाली. नगराध्यक्ष पदी निवड होताच काँग्रेस कार्यालयात सावली नगरपंचायतच्या माजी नगराध्यक्षा लताताई लाकडे, उपाध्यक्ष संदीप पुण्यपकार, सावली शहर अध्यक्ष नगरसेवक विजय मुत्यालवार, प्रीतम गेडाम, प्रफुल वाळके, सचिन संगिडवार, नितेश रसे, अंतबोध बोरकर, ज्योती शिंदे, ज्योती गेडाम, सीमा संतोषवार, प्रियांका रामटेके, अंजली देवगडे या सर्व नगरसेवकांनी अभिनंदन केले आणि भावी वाटचालीस शुभेच्छा दिल्या.