चोर बीटी बियाणे न वापरण्याचे तालुका कृषी कार्यालयाकडून आवाहन

चांदा ब्लास्ट प्रतिनिधी. अतुल कोल्हे
येत्या काळात खरीप हंगामाला सुरुवात होत आहे. तालुक्यात धानपिक, सोयाबीन व कापसाची लागवड मोठ्या प्रमाणात केल्या जाते. या काळात अनेक शेतकरी राज्यात बंदी असलेले चोर बीटी बियाणे परराज्यातून आणून त्याचा वापर करतात. मात्र सदर बियाणे अधिकृत नसल्याने त्याची उगवण न झाल्यास शेतकऱ्यांना नुकसान सहन करावे लागते व बिल नसल्याने त्याची दादही मागता येत नाही. त्यामुळे तालुक्यातील शेतकऱ्यांनी चोर बिटी बियाणे न वापरता परवानाधारक कृषी केंद्रातूनच अधिकृत बियाणे खरेदी करावे व बियाण्याचे बिल व त्याचे लेबल सांभाळून ठेवावे असे आवाहन तालुका कृषी कार्यालयाकडून एका प्रसिद्धी पत्रकाद्वारे करण्यात आले आहे.
एखाद्या शेतकऱ्याकडून चोर बीटी बियाणे वापरल्याची माहिती मिळताच तालुका कृषी कार्यालयाशी संपर्क साधावा, तक्रारकर्त्याचे नाव गुप्त राखण्यात येईल असे आवाहनही सदर प्रसिद्धी पत्रकाद्वारे करण्यात आले आहे.



