ग्रामीण वार्ताताज्या घडामोडीमहाराष्ट्र

देऊळगाव राजा शहरात मान्सूनपूर्व नालेसफाईला सुरुवात

नागरिकांना सोयी सुविधा पुरविण्यास नगरपरिषद सक्षम

चांदा ब्लास्ट प्रतिनिधी. प्रा. अशोक डोईफोडे

 पावसाळा सुरू होण्यापूर्वीच श्री बालाजी महाराजांच्या नगरीतील प्रमुख नाले व सर्वच मुख्य मार्गाच्या दुतर्फा सांडपाणी व पावसाचे पाणी वाहून जाण्यासाठी बांधण्यात आलेल्या नाल्यांचे सफाई कामाला नगरपरिषदेच्या वतीने सुरुवात करण्यात आलेली असून नागरिकांना पावसाळ्यात रस्त्याने चालताना कोणताही त्रास होऊ नये नालीतील घाण व घाण पाणी रस्त्यावर येऊ नये यासाठी नगरपरिषद च्या वतीने सर्व सोयी सुविधा पुरवण्याची जबाबदारी नगरपरिषदेची असल्याचे मुख्याधिकारी तथा प्रशासक अरुण मोकळ यांनी प्रसिद्धीस दिलेल्या पत्रकात नमूद केले आहे.

 त्यांनी प्रसिद्धीस दिलेल्या पत्रकात नमूद केले आहे की पावसाळा सुरू होण्यापूर्वीच शहरातील मोठे नाले व शहरातील सांडपाणी व पावसाचे पाणी वाहून जाण्यासाठी बांधण्यात आलेल्या नाल्या त्याचे सर्वेक्षण करण्यात आले असून न.प. मार्फत सर्वच नाले व नाल्यातील घाण साफ करून पावसाचे पाणी तुंबून रोडवर येणार नाही याची दक्षता घेतली आहे कोणाच्याही आरोग्यास या पावसाच्या पाण्यामुळे धोका होणार नाही यासाठी आरोग्य विभागाचे एक पथक 24 तास कार्यरत राहणार आहे नागरिकांनी घरातील सुका व ओला कचरा. ओले नारळ. थर्माकोल प्लास्टिक पन्नी या रोडवर व नाली मध्ये न फेकता न.प. च्या घंटा गाडीत टाकून नगरपरिषद प्रशासनाला सहकार्य करण्याचे आव्हान करत भविष्यात या नगरीत भूमिगत गटारे बांधण्याचे नियोजन करण्यात आले असून शासन स्तरावरून मान्यता मिळतात युद्ध पातळीवर भूमिगत गटारे बांधकामास सुरुवात करण्यात येईल असे सुद्धा प्रसिद्धी पत्रकात नमूद आहे तर आरोग्य निरीक्षक जतिन नकवाल व त्यांचे अधिनस्त सफाई कर्मचारी वेळोवेळी मुख्याधिकारी अरुण मोकळ यांचे मार्गदर्शनाखाली सफाईचे काम योग्यरीत्या करीत असल्याचे दिसून येत आहे आगामी पावसाळ्यात पावसाच्या पाण्याने व नाल्यातील घाण पाणी रोडवर येऊन नागरिकांना कोणताही त्रास होणार नाही याचे नियोजन पावसाळ्यापूर्वी करण्यात आलेले आहे.

यंदा कदाचित कोणत्याही भागात पावसाच्या पाण्याने नालीतील घाण रस्त्यावर आल्यास त्या भागातील नागरिकांनी नगर परिषद च्या आरोग्य विभागाशी संपर्क साधावा असे आवाहन करण्यात आले आहे.

शेअर करा

Related Articles

Back to top button
कॉपी करू नये