Breaking NewsBusiness NewsCelebrityEntertainmentFashionsHealth & EducationsPoliticsSportsToday's Marketकृषी व व्यापारक्रीडा व मनोरंजनग्रामीण वार्ताताज्या घडामोडीदेश विदेशफिल्मी दुनियामहाराष्ट्रराजकीय

ग्रामसफाई तथा घटस्थापणेने गवराळा येथे श्री संत गाडगे महाराज पुण्यतिथी महोत्सवाला सुरुवात

चांदा ब्लास्ट प्रतिनिधी. अतुल कोल्हे

     संत गाडगेबाबा स्मृती भवन गवराळा, भद्रावती येथे ग्रामसफाई तथा घटस्थापणेने कर्मयोगी श्री संत गाडगे महाराज यांच्या दोन दिवसीय पुण्यतिथी महोत्सवाला सुरुवात करण्यात आली. सकाळी ७ववाजता परीसरात ग्रामसफाई अभियान राबविण्यात आले.त्यानंतर दिप प्रज्वलन करून घटस्थापना करण्यात आली.

यानंतर रांगोळी स्पर्धा तथा गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार सोहळ्याचे आयोजन करण्यात आले. यानिमित्ताने स्मृती भवनात विवीध धार्मिक तथा सामाजीक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले. रात्रोला भजन तथा किर्तनाच्या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. दिनांक २२ला सकाळी ८ववाजता भवनातून श्री संत गाडगे महाराज यांच्या प्रतिमेची भव्य शोभायात्रा काढण्यात येईल.

सदर महोत्सवाला यशस्वी करण्यासाठी पुण्यतिथी महोत्सव समितीचे अध्यक्ष किशोर भोस्कर सचीव उज्वल किनेकर,सुखदेव पत्रकार, राजु आंबीलकर, संदीप चटपकार,बंडू भोस्कर, अनील बारसागडे,रविंद्र गड्डमवारजी,विजय डुकरे,आण्याजी सोनुलकर,धिरज किनेकर,यांचेसह समितीचे पदाधिकारी व सदस्य सहकार्य करीत आहे.

शेअर करा

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
कॉपी करू नये