अट्टल घरफोडी करणारी महीला आरोपीकडुन गुन्हयातील २ लाख ९२ हजारावर मुद्देमाल जप्त
जिल्हयातील घरफोडीचा गुन्हा उघडकीस

चांदा ब्लास्ट प्रतिनिधी. अविनाश नागदेवे
पोलीस स्टेशन, पुलगाव येथे फिर्यादी नामे सतिष भिमरावजी पाचवारे, वय ४५ वर्षे, रा. दयालनगर पुलगाव ता. देवळी जिल्हा वर्षा यांनी फिर्यादी दिली कि, दिनांक १०/०५/२०२५ रोजी दुपारी ११/३० वा. दरम्याण ते परीवारासह ऑनलाईन सेंटर येथे कामा करीता गेले असता कुणीतरी अज्ञात चोरट्याने घरात प्रवेश करून घरातील आलमारी मध्ये ठेवुन असलेले सोन्या, चांदीचे दागिणे व नगदी काढून चोरून नेले अश्या तकार वरून पोलीस स्टेशन पुलगाव येथे गुन्हा दाखल करण्यात आला होता.
सदर गुन्हयाचा स्थानीक गुन्हे शाखा, वर्धा तर्फे समांतर तपास करीत असतांना गोपनीय माहीतीवरून सदर गुन्हा हा अमरावती शहर येथील रेकॉर्डवरील महीला नामे सिमा परवीन नसिम शेख, वय ४५ वर्षे, रा. हैदरपुरा सादीयानगर सरकारी दवाखाण्याजवळ, अमरावती हीने केला असल्याचे निष्पन्न झाल्याने तीचा शोध घेतला असता महीला आरोपी हि आकाशवाणी चौक, चंद्रपुर येथे मिळुन आल्याने तिला रितसर ताब्यात घेवुन तिला महीला अंमलदार यांच्या हस्ते गुन्हयासंबंधाने विचारपुस केली असता तीने सदर गुन्हा केल्याची माहिती दिली व गुन्हयातील चोरी केलेला संपुर्ण मुद्देमाल हा तिचे परीचयाचा अमरावती शहर येथील सोनार दुकानदारास विकी केल्याचे सांगीतले त्यावरून अमरावती येथे जावुन सराफा दुकानदार यांचे कडुन गुन्हयात चोरीस गेलेले सोन्याचा दागिणे एकुण वजन ३२.५०० ग्रॅम गोलाकार रवा, किंमत २,९२,५००/-रूपये चा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.
सदरची कारवाई मा. श्री. अनुराग जैन, पोलीस अधीक्षक वर्धा, मा. डॉ. श्री. सागर कवडे, अपर पोलीस अधिक्षक, यांचे मार्गदर्शनात पोलीस निरीक्षक श्री. विनोद चौधरी, पोउपनि श्री. राहुल इटेकर, श्री. बालाजी लालपालवाले, पोलीस अंमलदार गजानन लामसे, चंद्रकांत बुरंगे, भुषण निघोट, मनिष कांबळे, रितेश शर्मा, अमोल नगराळे, गोपाल वावणकर, मंगेश आदे, दिपक साठे, प्रफुल पुनवटकर, महीला पोलीस अंमलदार निलीमा उमक सर्व नेमणूक स्थानिक गुन्हे शाखा, वर्धा यांनी केली. वर्धा फैमोद्दीन शेख