आरटीएसई परीक्षेत लालगुडा जि.प.शाळेची प्रतिक्षा मरस्कोल्हे जिल्ह्यात टॉपर

चांदा ब्लास्ट प्रतिनिधी. प्रा. अशोक डोईफोडे
एम पी एस सी व यू पी एस सी च्या धर्तीवर इ. दुसरी ते नववी पर्यंत प्रत्येक वर्गासाठी घेतल्या जाणाऱ्या राज्यस्तरीय आरटीएसई परीक्षेत कोरपना तालुक्यातील जि.प. लालगुडा शाळेतील इ. चौथी मधील प्रतिक्षा फकरू मरस्कोल्हे ही विद्यार्थिनी चंद्रपूर जिल्ह्यात टॉपर आली आहे.
सदर परीक्षेत शाळेचे इ.चौथीचे तीन विद्यार्थी बसले होते. प्रतिक्षा मरस्कोल्हे १५० गुण, शिवानी आत्राम १४४ गुण तर ईशानी तोडासे १४० गुण घेऊन गुणवत्ता श्रेणीत उत्तीर्ण झाले आहेत.
या विद्यार्थ्यांना शिष्यवृत्ती धनादेश,मेडल व प्रमाणपत्र प्राप्त होणार आहेत.या यशाबद्दल पंचायत समितीचे गटशिक्षणाधिकारी सचिनकुमार मालवी,शिक्षण विस्तार अधिकारी कल्याण जोगदंड ,केंद्रप्रमुख (गडचांदूर)पंढरी मुसळे,केंद्रप्रमुख (सोनुर्ली) विलास देवाळकर तथा ग्राम पंचायत सदस्य मंगेश धुर्वे, शालेय व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष फकरू मरस्कोल्हे,उपाध्यक्ष अमावस्या तोडासे,सदस्य प्रमोद तोडासे, मनिषा मेश्राम,वंदना तोडासे, मंगल तोडासे आदी मान्यवरांनी विद्यार्थ्यांचे अभिनंदन केले.विद्यार्थ्यांनी आपल्या यशाचे श्रेय मार्गदर्शक शिक्षक गोविंद पेदेवाड,मुख्याध्यापक प्रकाश बोबडे तथा आई वडिलांना दिले.