ग्रामीण वार्ताताज्या घडामोडीमहाराष्ट्र

एफ.टी.के. मोहिमेमुळे नागरिकांना मिळेल शुद्ध व सुरक्षित पिण्याचे पाणी – मुख्य कार्यकारी अधिकारी पुलकीत सिंग

पाणी गुणवत्ता तपासणी जनजागृती मोहिमेचा जिल्हास्तरीय शुभारंभ

चांदा ब्लास्ट

चंद्रपुर (प्रतीनिधी) राज्य शासनाच्या निर्देशानुसार ग्रामिण भागातील पिण्याच्या पाण्याच्या स्त्रोतांची रासायनिक व जैविक पाणी गुणवत्ता तपासणी करण्यासाठी दिनांक १२ मे ते ७ जून २०२५ या कालावधीत “क्षेत्रीय तपासणी संच (FTK)” संचा द्वारे पाणी गुणवत्ता तपासणी जनजागृती मोहीम जिल्ह्यात राबविण्यात येत आहे. नागरिकांना सुरक्षित व स्वच्छ पिण्याचे पाणी मिळावे यासाठी जिल्ह्यातील 1400 गावांमध्ये ही मोहीम प्रभावीपणे राबविण्याचे आवाहन जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी पुलकीत सिंग यांनी केले आहे.

        एफ.टी.के. संचाद्वारे पाणी गुणवत्ता तपासणी जनजागृती मोहीम ही ग्रामपंचायत विभाग, महिला व बालकल्याण विभाग, आरोग्य विभाग, शिक्षण विभाग व पाणी पुरवठा विभागाच्या सहभागातून यशस्वी केली जाणार आहे. या मोहीमेच्या जिल्हास्तरीय शुभारंभ कार्यक्रमात मुख्य कार्यकारी अधिकारी पुलकीत सिंग यांचे हस्ते शुभारंभ करण्यात आला. यावेळी जल जीवन मिशनचे प्रकल्प प्रमुख नुतन सावंत ,जिल्हा आरोग्य अधिकारी अशोक कटारे, प्रकल्प संचालक जिल्हा ग्रामीण विकास यंत्रणा गीरीश धायगुडे , वरीष्ट भुवैज्ञानीक लीना बाराहाते, जिल्हा कार्यक्रम व्यवस्थापक संजय धोटे, पाणी गुणवत्ता तज्ञ अंजली डाहुले तसेच जिल्हा पाणी व स्वच्छता विभागातील सल्लागार व कर्मचारी जिल्हास्तरीय शुभारंभाला उपस्थीत होते.

जैविक क्षेत्रीय तपासणी (एफ.टी.के.) संचाद्वारे गावांमध्ये जनजागृती अभियान राबविण्यासाठी सुरु झालेल्या मोहिमेतंतर्गत गावात पाणी तपासणी करण्यासाठी निवड केलेल्या व संकेतस्थळावर नोंदविलेल्या पाच महिलांची पडताळणी करणे, महिलांच्या पाणी गुणवता विषयक एफ.टी.के. किट प्रशिक्षणाच्या नोंदी घेणे घरगुती नळ, अंगणवाडी, शाळा यांची पाणी नमुणे तपासणी केली जाणार आहे. या मुळे पाणी तपासणीत महिलांची भूमिका महत्वाची व निर्णयक ठरणार असुन ही मोहीम गट विकास अधिकारी, आरोग्य विभागातील कर्मचारी, ग्रामसेवक यांनी गावा गावात चांगली राबवावी असे प्रतीपादन मुख्य कार्यकारी अधिकारी पुलकीत सिंग यांनी केले.

गावात आठवी ते दहावीमधील विद्यार्थ्यांना एफ. टी. के. किटव्दारे पाणी तपासणीचे प्रात्यक्षिक देणे, वर्ग ८ ते १० मधील विद्यार्थ्यांमार्फत शाळा, अंगणवाड्या, घरगुती नळ जोडण्यामधील पाणी नमुने तपासणी करणे, डब्यूक्यूएमआयएस (WQMIS) पोर्टलवर नोंदी घेणे, नळ पाणी पुरवठा योजना स्त्रोत, घरगुती नळ जोडण्या, शाळा, अंगणवाड्यांची पाणी गुणवता तपासणी करण्यासाठी रासायनिक व जैविक एफ.टी.के.किट वाटप करणे, तसेच स्थानिकांना पाणी गुणवत्ता तपासणी व त्यापासून होणारे फायदे सांगितले जाणार असल्याचे प्रकल्प संचालक नुतन सावंत यांनी सांगीतले.

            दिनांक १९ ते २३ मे २०२५ या कालावधीत जनजागृती मोहिमेचा तालुकास्तरीय शुभारंभ गट विकास अधिकारी यांचे हस्ते करण्यात येणार आहे तर दि. २ जून ते ७ जून २०२५ कालावधीत मोहिमेची ग्रामपंचायत स्तरावर प्रत्यक्ष अंमलबजावणी होईल. या मोहिमेदरम्यान जिल्हयात क्षेत्रीय तपासणी संच (एफ.टी.के.) द्वारे पाणी पाणी गुणवत्ता तपासणी आणि व्यापक जनजागृती करण्यात येणार असल्याचे जल जीवन मिशन चे प्रकल्प संचालक नुतन सावंत यानी सांगीतले.

शेअर करा

Related Articles

Back to top button
कॉपी करू नये