ग्रामीण वार्ताताज्या घडामोडीमहाराष्ट्र

आमदार देवराव भोंगळे यांच्या पुढाकाराने शहरात मोफत जलसेवा सुरू 

चांदा ब्लास्ट प्रतिनिधी. प्रमोद गिरडकर

वाढत्या उन्हामुळे शहराला पाणीपुरवठा करणाऱ्या जलस्त्रोतांची पाणीपातळी घटत चालल्याने कोरपना शहर व परिसरात पाणीटंचाई जाणवत आहे. या पाश्र्वभूमीवर नागरिकांना दिलासा देण्यासाठी काल दि. १५ मे रोजी स्थानिक भाजपा जनसंपर्क कार्यालय तथा मा. आ. श्री. सुधीरभाऊ मुनगंटीवार सेवा केंद्र च्या समोर आमदार देवराव भोंगळे यांनी पाणी टँकरना हिरवी झेंडी दाखवून निःशुल्क जलसेवेचा शुभारंभ केला.

प्रसंगीच, राजुरा विधानसभेतील कोरपनासह अन्य तालुक्यांमध्येही कुठे पाणीटंचाई सदृश परिस्थिती निर्माण होत असल्यास नागरिकांनी आपल्या जवळच्या भाजप पदाधिकारी, कार्यकर्त्यांना किंवा नजीकच्या सेवा केंद्रास कळवावे आम्ही आपल्या जलसेवेकरता तत्पर आहोत, असेही आमदार देवराव भोंगळे यांनीआवाहन केले.

यावेळी तालुकाध्यक्ष संजय मुसळे, तालुका महामंत्री सतिश उपलेंचवार, शहराध्यक्ष अमोल आसेकर, जिल्हा अनु. जमाती मोर्चाचे जिल्हाध्यक्ष अरूण मडावी, महामंत्री प्रमोद कोडापे, अबरार अली, पुरुषोत्तम भोंगळे, आशिष ताजने, किशोर बावणे, मनोज तुमराम, दिनेश खडसे, दिनेश ढेंगळे, कार्तिक गोण्लावार, नैनेश आत्राम, अशोक झाडे, निखिल भोंगळे, संजय नीत, अल्का रणदिवे, ज्योत्स्ना वैरागडे, नगरसेविका गीता डोहे, वर्षा लांडगे, सविता तुमराम नगरसेवक सुभाष हरबडे, प्रमोद पायघन, पुंडलिक उलमाले , जितेंद्र पिंपळकर, अल्ताफ बेग, सत्यवान घोटेकर,सहेबाज अली, पद्माकर दगडी,धम्मकिर्ती कापसे, दिनेश सुर, अमोल गोरे, शंकर चिंतलवार, अभय डोहे, सुरज येडे, शैलेश परसुटकर, शंकर चिंतलवार, अजय तिखट, सतीश तंगडपल्लीवार, विठ्ठल तुकाराम, जगदीश पिंपळकर, आशिष देवतळे, रवी बंडीवार, सतीश जमदाळे आदिंसह शहरवासीयांची प्रामुख्याने उपस्थिती होती.

शेअर करा

Related Articles

Back to top button
कॉपी करू नये