चारचाकी वाहनासह विदेशी दारुचा एकूण 5 लाख 31 हजारावर मुद्देमाल जप्त

चांदा ब्लास्ट प्रतिनिधी. अविनाश नागदेवे
स्थानिक गुन्हे शाखा, वर्धा नी पो. स्टे. वर्धा शहर परीसरात अवैद्य धंदयावर प्रो. रेड कामी पेट्रोलींग करीत असतांना मुखबिरकडुन मिळालेल्या गोपणीय माहितीवरून नाकेबंदी केली असता आरोपी नामे शुभम उर्फ शेरू कुमार उडवाणी वय 24 वर्ष रा. दयालनगर, वर्धा हा त्याचे ताब्यातील काळा रंगाची स्कोडा कंपनीची गाडी क्रमांक एम.एच. 03 बी.इ. 5982 मध्ये अवैधरित्या विदेशी दारू व बियर ची वाहतूक करताना मिळून आल्याने त्याचे ताब्यातून 1) एका खर्ड्याचे खोक्यात रॉयल स्टॅग कंपनीच्या विदेशी दारू ने भरलेल्या 180 एम.एल. च्या एकूण 24 सीलबंद शीशा 8,400/-रु, 2) एक खर्ड्याचे खोक्यात मेकडॉल नं. 1 कंपनीच्या विदेशी दारू ने भरलेल्या 180 एम. एल. च्या एकूण 24 सीलबंद शीशा 8,400/-रु, 3) 2 खर्ड्याचे खोक्यात बडवायझर मॅग्नम कंपनीच्या बियरने भरलेल्या 500 एमएल च्या 48 सीलबंद कॅन किं. 14,400/-रु. 4) एक स्कोडा फेबिया कंपनीची कार क्र. एमएच 32 बीई 5982 किं. 5,00,000/-रु. असा एकूण जु. किं. 5,31,200/- रुपये चा मुद्देमाल मिळून आल्याने जप्त करून आरोपीने सदरचा माल हा कळंब जिल्हा यवतमाळ येथील एमडी ट्रेडर्स बार मधून आणल्याचे सांगितल्याने सदर दोन्ही आरोपीताविरुद्ध पो. स्टे. वर्धा शहर येथे गुन्हा नोंद करून तपासात घेतला.
सदर कारवाई मा. श्री. अनुराग जैन साहेब, पोलीस अधिक्षक वर्धा, मा. श्री. सागर कवडे साहेब अपर पोलीस अधिक्षक वर्धा, यांचे मार्गदर्शनात – श्री. विनोद चौधरी, पोलीस निरीक्षक स्थानिक गुन्हे शाखा, वर्धा, पोउपनी बालाजी लाल पालवाले, राहुल ईटेकर, पो.हवा. चंद्रकांत बुरंगे, भूषण निघोट, मनिष कांबळे, अमोल नगराळे, प्रफुल पूनवटकर सर्व स्थानिक गुन्हे शाखा, वर्धा यांनी केली