ग्रामीण वार्ताताज्या घडामोडीमहाराष्ट्र

देऊळगाव राजा हायस्कूल दे.राजाची उत्कृष्ठ निकालाची परंपरा कायम

चांदा ब्लास्ट प्रतिनिधी. प्रा. अशोक डोईफोडे

देऊळगाव राजा हायस्कूल दे.राजा चा वर्ग 10 वी चा निकाल या ही वर्षी उत्कृष्ठ देऊळगाव राजा हायस्कूल असून शाळेचा निकाल 97.29 टक्के लागला असून कु.अनुष्का सुदर्शन डिघोळे व श्रावण लक्ष्मण कोल्हे या विद्यार्थ्यांनी 97.40 टक्के गुण घेऊन प्रथम क्रमांक पटकावला आहे.तर वेदांत देविदास गव्हाळे हा 96.80 टक्के घेऊन द्वितीय क्रमांकाने उत्तीर्ण झाला आहे.प्रथमेश संतोष जोशी याने 96.60 टक्के गुण प्राप्त करून तृतीय क्रमांक पटकावला आहे.

निकालाचे वैशिष्टय असे की, 90 टक्के च्या वर 43 विद्यार्थ्यांनी गुण प्राप्त केले असून,गणित विषयात तीन विद्यार्थ्यांनी 100 पैकी 100   गुण प्राप्त केले असून,विज्ञान विषयात पाच विद्यार्थ्यांनी 100 पैकी 100 गुण प्राप्त केले आहे.

देऊळगाव राजा शिक्षण संस्थेचे अध्यक्ष मा.शांतीलालदादा सिंगलकर,आदरणीय ओमप्रकाशजी धन्नावत (कोषाध्यक्ष), सुबोधभाऊ मिश्रीकोटकर (सचिव), सन्माननीय संचालक, सदस्य, प्राचार्य,पर्यवेक्षक, शिक्षक,शिक्षिका यांनी अभिनंदन करून शुभेच्छा दिल्या.

शेअर करा

Related Articles

Back to top button
कॉपी करू नये