स्वामी विवेकानंद विद्यालयाचा १० वीच्या उत्कृष्ठ निकालाची परंपरा कायम

चांदा ब्लास्ट प्रतिनिधी. प्रा. अशोक डोईफोडे
राज्याच्या माध्यमिक शालान्त परीक्षा मार्च 2025 च्या इयत्ता १० वीचा निकाल नुकताच जाहीर झालेला आहे. या निकालात देऊळगावराजा शहरातील स्वामी विवेकानंद माध्यमिक विद्यालय, देऊळगावराजा, जि. बुलडाणा या शाळेचा 98.98% टक्के निकाल लागला आहे. या विद्यालयातून एकुण 99 विद्यार्थी परीक्षेसाठी प्रविष्ठ होते पैकी 14 विद्यार्थ्यांनी ९०% पेक्षा जास्त गुण संपादित केलेले आहे तसेच 30 विद्यार्थी विशेष प्राविण्य, 55 विद्यार्थी प्रथम श्रेणीत उत्तीर्ण झालेले आहे. प्रसाद विलास डुकरे 98.60% गुण संपादन करून तालुक्यातून सर्व प्रथम येण्याचा मान मिळविलेला आहे. तसेच विद्यालयातून सई मिलिंद सुर्वे हिने 96.00% गुण संपादित करून द्वितीय क्रमांक, कु. दर्शना नंदकिशोर म्हस्के हिने 93.20% गुण संपादित करून तृतीय क्रमांक प्राप्त केलेला आहे.
तसेच विद्यालयातील कु. आराध्या बिथरे(93.20), कु. वैष्णवी गायकवाड (92.80%), आदित्य चव्हाण(92.60%), शिवराज बनकर (92.40%),कु. भूमिका पाटील(92.40%), ओम शेळके (92.20%), समीर पठाण( 92.20%), जयदत्त कुडे (92.00%), गजानन बंगाळे (92.00%), ओम शेडगे (91.80%), कु. अनुष्का तिडके(91.60%) या सर्व विद्यार्थ्यांनी ९०% पेक्षा जास्त गुण संपादित करून नेत्रदिपक यश प्राप्त केलेले आहे.
विद्यालयाचा उत्कृष्ठ निकाल लागलेला असून संस्थेचे अध्यक्ष डॉ. रामदास शिंदे व सर्व पदाधिकारी, पालकवर्ग यांनी सर्व गुणवंत विद्यार्थ्यांचे तसेच विद्यालयाचे मुख्याध्यापक व सर्व शिक्षकांचे सुद्धा अभिनंदन केले.
सर्व स्तरातून गुणवंत विद्यार्थी,शाळेतील सर्व शिक्षक वृंद, सन्माननीय संस्थाचालक आदींवर समाजातून कौतुकाचा वर्षाव होत आहे