स्कॉलर्स सर्च अकॅडेमी चा उत्कृष्ट निकाल

चांदा ब्लास्ट प्रतिनिधी. प्रमोद गिरडकर
कोरपना : माध्यमिक व उच्च माध्यमिक शालांत परीक्षेचा निकाल जाहीर झाला. यात सर्च फाऊंडेशन द्वारा संचालित स्कॉलर्स सर्च अकॅडेमी, कोरपना चा दहावीचा 97.22 % टक्के निकाल व बारावीचा 100% लागला. यात दहावीत विद्यालयातून प्रथम क्रमांक श्रुती खुशाल खिरटकर ( 84.20 टक्के) द्वितीय क्रमांक प्रिया देवरथ सरकार (80.40 टक्के) तर तृतीय क्रमांक स्वाती मीनानाथ पेटकर (79.40 टक्के) यांनी पटकाविला. या परीक्षेत एकून 72 विद्यार्थी बसले होते. त्यापैकी 7 प्रावीण्य श्रेणी, 14 प्रथम श्रेणीत व. 49 उत्तीर्ण श्रेणीत असे एकूण 70 हि विद्यार्थी पास झाले.
सर्व यशस्वी विद्यार्थ्यांचे सर्च फाउंडेशन चे संस्थापक इंजी दिलीप झाडे, कुंदा झाडे डॉ कविता हींगाने संचालक मंडळ, प्राचार्य राहुल उलमाले, करिष्मा साटोने, प्रणाली खडसे, संतोष जेणेकर, सारिका ढोंगले, भावना मोरे, तनुजा टोंगे, गौरव कवरासे, विशाल मालेकार मिनाक्षी झाडे सर्व प्राध्यापक, कर्मचारी वृंद यांनी अभिनंदन केले.