ग्रामीण वार्ताताज्या घडामोडीमहाराष्ट्र

शेतकरी उद्योजक म्हणून शेती करावी तरच आर्थिक समुद्धी : तोटावार जिल्हा कृषी अधिक्षक                

चांदा ब्लास्ट प्रतिनिधी. प्रमोद गिरडकर

    मा. बाळासाहेब ठाकरे मुल्यवर्धन साखळी ग्राम परिवर्तन योजने अंतर्गत (स्मार्ट) प्रकल्पाच्या सिल्वर स्टोन शेतकरी उत्पादक कंपनी द्वारा आयोजित गोदाम स्वच्छता प्रकीया कामाचे भुमिपुजन व शेतकरी सभासद आयोजित मेळाव्याचे अध्यक्षस्थानी शंकर तोटावार जिल्हा अधिक्षक कृषि अधिकार मार्गदर्शन करताना वातावरण बदल जमीनीची सुपिकता नष्ट होत असल्याने उत्पादनावर परिणाम होऊन शेती विषयक रुची नव्या पिढीत उतरतीकळा दिसते मात्र शेती परंपरागत नव्हे तर आधुनिक तंत्रज्ञांनाचा उपयोग करूण उद्योजक म्हणून शेती करावी असे मत व्यक्त केले.

उदघाटक म्हणून प्रितीताई हिरळकर यांनी स्मार्ट प्रकल्पाच्या विविध उपक्रमाची माहीती दिली शेतकरी दर्जेदार उत्पादन व प्रक्रीया करणारे प्रकल्प उभारणीत शेतकरी उत्पादक कंपनीला पुढाकार आवश्यक असून शेतकरी सभासदाना विपणन प्रकीया साठवणूक तारण धान्य ठेऊन आर्थिक लाभ मिळण्यास स्मार्ट योजना प्रभावी ठरत आहे जिल्ह्यात मजुर टंचाई साठवणूकीचा प्रश्न गंभीर असल्याने शेतकरी हतबल होऊन उत्पादीत धान्य विकतो त्यामुळे मा बाळासाहेब ग्रामीण परिवर्तन प्रकल्पात सहभागी होऊन पर्यायी व्यापार व्यवस्था निर्माण करता येईल भारतिय रिजर्व बॅकेचे नागपूर आंचल विभागाच्या व्यवस्थापक निर्मीष्ठा मॅडमनी बचत ठेवी व जोखिम या बाबत सतर्कता व बॅकेच्या ९० व्या वर्षात पदार्पण निर्मात्य फळझाड लागवड व सभासदाना झाडाचे वाटप करण्यात आले.

राज्यपुरस्कृत योजने अंतर्गत शेतकऱ्याना बॅटरी चलीत पंपाचे वितरण करण्यात आले कृषी विभागामार्फत ४०३ फवारणी पंप वितरण करण्यात येत असल्याची माहिती तालुका कृषी अधिकारी ठाकुर यांनी दिली प्रस्ताविक सय्यद आबिद अली यांनी सिल्वर स्टोन शेतकरी उत्पादक कंपनीचा लेखाजोखा सादर करूण गोदामाची आवश्यकता स्मार्ट प्रकल्पातून होत असल्याने सभासदाना यांचा लाभ होईल असे मत व्यक्त केले यावेळी जिल्हा नोडल अधिकारी घोडमारे मादेवार यांचे सह मंडल अधिकारी ढोणे राठोड उपस्थीत होते संचलन सुहेल अली यांनी केले आभार शंकर ठावरी यांनी मानले मंचावर निलेश ताजने इरफान शेख अजहर शेख शुभम थिपे संतोष मोतेवाड इमरान कुरैशी सविता खापने जोत्सना कोडापे रमेश डाखरे याचे सह शेकडो सभासद उपस्थित होते विना मशागत सेन्द्रीयशेतीतून कापूस सोयाबिज उत्पादण घेणाऱ्या राजा डाखरे जंगु सोयाम यांचे सत्कार प्रकल्प संचालक प्रिति हिरळकर यांनी केले.

शेअर करा

Related Articles

Back to top button
कॉपी करू नये