भगवान बुद्धांची शिकवण व विचार हा शांतिमय जीवन जगण्याचा मार्ग – पुलकित सिंह, जि. प. मुख्य कार्यकारी अधिकारी
बुद्ध पौर्णिमेच्या मंगलमय पर्वावर ओमॅट वेस्ट लिमिटेड च्या वतीने येरुर येथे नवनिर्मित बुद्ध विहार लोकार्पण सोहळा संपन्न

चांदा ब्लास्ट
चंद्रपूर : भगवान बुद्धांची शिकवण व विचार हा शांतिमय जीवन जगण्याचा मार्ग आहे. भगवान बुद्धांच संपूर्ण जीवन प्रवास हा प्रत्येकांना प्रेरणा देणारा असून त्याचा खऱ्या अर्थाने अवलंब केल्यास प्रगतीची शिखरे गाठण्यास नक्कीच यश मिळतो असे प्रतिपादन जिल्हा परिषद मुख्य कार्यकारी अधिकारी पुलकित सिंह यांनी येरुर येथे बुद्ध पौर्णिमेच्या मंगलमय पर्वावर ओमॅट वेस्ट लिमिटेड (श्री सिद्धबली इस्पात लिमिटेड) यांच्या वतीने नवनिर्मित बुद्ध विहार लोकार्पण प्रसंगी व्यक्त केले.
प्रसंगी मंचावर उदघाटक व अध्यक्ष म्हणून जिल्हा परिषद मुख्य कार्यकारी अधिकारी पुलकित सिंह, प्रमुख अतिथी म्हणून ओमॅट वेस्ट लिमिटेड चे प्लांट हेड अविनाश डोंगरे, मुख्य कार्यकारी अधिकारी रिषभ मित्तल, येरूरच्या सरपंचा प्रियंका मडावी, उपसरपंचा सुनीता वडस्कर यांची प्रामुख्याने उपस्थिती होती.
ओमॅट वेस्ट लिमिटेड च्या वतीने गावांत बुद्ध विहाराची निर्मिती करून वर्तमान व भावी पिढीसमोर भगवान बुद्धांच्या विचारास एकरूप होण्याची संधी निर्माण करून दिली आहे. आज भारत व पाकिस्तान या देशांत युद्धाची परिस्थिती निर्माण झाल्याचे चित्र निर्माण झाले असतांना भगवान बुद्धांचा शांतीचा संदेश याठिकाणी व्यापक पद्धतीने काम करू शकतो. भगवान बुद्धांनी आपल्या जीवनात अनेक त्याग करून आपल्या विचारांनी अनेकांचे आयुष्य घडवले आहे असेही मुख्य कार्यकारी अधिकारी पुलकित सिंह यांनी आपल्या संबोधनातून सांगितले.
ओमॅट वेस्ट लिमिटेड च्या विविध उपक्रमांची माहिती देत येत्या काळात अनेक सामाजिक उपक्रमाच्या माध्यमातून गरजू व्यक्ती तसेच गावात सोयी सुविधा व विकासात्मक दृष्टिकोनातून काम करणार असल्याचे मनोगत आपल्या प्रास्ताविकावून प्लांट हेड अविनाश डोंगरे यांनी सांगितले.
भूतकाळात व वर्तमानात उदार भावनेतून सदैव सकारात्मक सहकार्य ओमॅट वेस्ट लिमिटेड च्या माध्यमातून गांवात होत असतांना भविष्यातही हि साखळी कायम स्वरूपी राहील हि अपेक्षा आपल्या संबोधनातून सरपंच प्रियांका मडावी यांनी व्यक्त केली. या कार्यक्रमाचे संचालन कपिल शेंडे यांनी तर आभार प्रदर्शन रवि चावरे यांनी केले.
ओमॅट वेस्ट लिमिटेड चे महाप्रबंधक रवी चावरे यांच्या पुढाकारातून संपन्न या कार्यक्रमाच्या यशस्वीततेकरिता महाप्रबंधक मनीष वडस्कर, महाप्रबंधक अमरेंद्र सिंह ठाकूर, महाप्रबंधक सतीश मूलकलवार, महाप्रबंधक ओमनरेश भदोरिया, मानव संसाधन विभाग प्रमुख अभय सिंह, प्रशासन विभाग प्रमुख दीपक पराळे, बांधकाम विभाग प्रमुख चेतन चोहिवाल, विजय कनोजे, आनंद मिश्रा, कपिल जैन, अभिषेक खुपत, शुभम तंबोली, स्वप्नील देशमुख, खुशाल गावंडे, समीर पाल, अशोक टोंगे यांनी विशेष योगदान दिले.