ग्रामीण वार्ताताज्या घडामोडीमहाराष्ट्र

कवठी येथे सार्वजनिक वाचनालयाच्या इमारत बांधकामाचे भूमिपुजन

जिल्हा खनिज प्रतिष्ठान चंद्रपूर निधीतून मंजूरी

चांदा ब्लास्ट प्रतिनिधी. डॉ. शेखर प्यारमवार

 सावली तालुक्यातील कवठी येथे सार्वजनिक वाचनालयाच्या इमारत बांधकामाचे भूमिपुजन कार्यक्रम मंगळवारी पार पडले. जिल्हा खनिज प्रतिष्ठान चंद्रपूर निधीतून इमारत बांधकामाला प्रशासकीय मान्यता मिळाली आहे.एक कोटी 48 लाख रूपये यासाठी मंजूर झाले आहेत. कवठी येथील सरपंचा कांताबाई बोरकुटे आणि उपसरपंच राकेश घोटेकार यांच्या हस्ते कुदळ मारून भूमीपुजन करण्यात आले.

यावेळी शहीद सुरेश पाटिल सुरकर विदयालयाचे मुख्याध्यापक किरन खोब्रागडे, मुख्याध्यापक नंदीग्रामवार,ग्रामपंचायत सदस्य विलास बटटे,ग्रामपंचायत अधिकारी पारधी,वनरक्षक मुरकूटे,प्रतिष्ठीत नागरिक प्रकाश घोटेकार,बंडू घोटेकार,सहा.शिक्षक विनायक रेकलवार,प्रा.शेखर प्यारमवार,लता सलामे आणि कंत्राटदार जितू पटेल यांची यावेळी उपस्थिती होती.मान्यवरांच्या हस्ते विधीवत पुजन करण्यात आले. कवठी येथे प्राथमिक आणि माध्यमिक शाळा आहे.तसेच दहावी पास झालेले विदयार्थी तालुक्याच्या शाळेत जावून पुढील शिक्षण घेत आहेत.

आजचे युग स्पर्धा परिक्षांचे असल्याने गावात एकही वाचनालय नव्हते.त्या अनुषंगाने गावातील सर्वच विदयार्थ्यांना सार्वजनिक वाचनालयाचा लाभ मिळावा यासाठी सातत्याने प्रयत्न करण्यात आले. त्या प्रयत्नाचे फळ म्हणून जिल्हा खनिज प्रतिष्ठान चंद्रपूर निधीतून इमारत बांधकामाला प्रशासकीय मान्यता मिळाल्याची माहिती यावेळी उपसरपंच राकेश घोटेकार यांनी दिली.

सार्वजनिक वाचनालयाच्या इमारतीचे बांधकाम सुसज्ज आणि देखणे व्हावे आणि या वाचनालयाच्या माध्यमातून विदयार्थी घडावे.पुस्तक वाचनाचे अनन्य साधारण महत्व असल्याने हे वाचनालय गावाच्या विकासासाठी महत्वाचे ठरेल अशी अपेक्षा उपस्थित मान्यवरांनी व्यक्त केली.

भूमीपुजन कार्यक्रमाला गावातील प्रतिष्ठीत नागरिक,गावकरी मंडळी आणि विदयार्थी उपस्थित होते.

शेअर करा

Related Articles

Back to top button
कॉपी करू नये