ग्रामीण वार्ताताज्या घडामोडीमहाराष्ट्र

मुख्यमंत्री माझी शाळा सुंदर शाळा उपक्रमात यशवंतराव शिंदे विद्यालय व कनिष्ठ महाविद्यालय द्वितीय पुरस्काराने सन्मानित

चांदा ब्लास्ट प्रतिनिधी. अतुल कोल्हे

    भद्रावती शिक्षण संस्था भद्रावती व्दारा संचालित यशवंतराव शिंदे विद्यालय व कनिष्ठ महाविद्यालय चिचोर्डी भद्रावती या शाळेने मुख्यमंत्री माझी शाळा सुंदर शाळा उपक्रमात भद्रावती तालुक्यात व्दितीय क्रमांक पटकाविला.

भद्रावती येथील यशवंतराव शिंदे विद्यालय व कनिष्ठ महाविद्यालय या शाळेने मुख्यमंत्री माझी शाळा सुंदर शाळा टप्पा २ या उपक्रमात सहभाग नोंदविला. मुख्यमंत्री माझी शाळा सुंदर शाळा या उपक्रमात सहभागी झालेल्या सर्व शाळांची पर्यवेक्षण यंत्रणेमार्फत तपासणी करण्यात आली. त्यात या शाळेला भद्रावती तालुक्यात द्वितीय क्रमांक प्राप्त झाला व दोन लाख रुपयाचे पारितोषिक प्राप्त झाले.

 मुख्यमंत्री माझी शाळा सुंदर शाळा या उपक्रमात विद्यालय व कनिष्ठ महाविद्यलयाचे प्राचार्य डॉ जयंत वानखेडे सर यांनी विशेष परिश्रम घेतले. शाळेला उत्कृष्ट बनवून भद्रावती तालुक्यातील अग्रगण्य शाळा असल्याचे या पुरस्काराने शिक्कामोर्तब झाले. यशवंतराव शिंदे विद्यालय व कनिष्ठ महाविद्यालय या शाळेने शैक्षणिक प्रगती सोबतच क्रीडा क्षेत्रात उल्लेखनीय कामगिरी केली.

शाळेला मुख्यमंत्री माझी शाळा सुंदर शाळा टप्पा २ या उपक्रमांतर्गत भद्रावती तालुक्यात द्वितीय पारितोषिक मिळाल्याने प्राचार्य डॉ जयंत वानखेडे सर यांचे भद्रावती शिक्षण संस्था भद्रावती चे अध्यक्ष डॉ. विवेक शिंदे, सचिव प्रा. डॉ कार्तिक शिंदे, सहसचिव प्रा. डॉ. विशाल शिंदे, विश्वस्त श्रीमती निलिमाताई शिंदे यांनी अभिनंदन केले.

या नाविन्यपूर्ण कामगिरी मुळे या शाळेने शैक्षणिक क्षेत्रात उंच भरारी घेतली आहे. तालुक्यात शैक्षणिक क्षेत्रासोबतच अनेक क्षेत्रात अव्वल असल्याचे पुन्हा सिध्द केले आहे.

शेअर करा

Related Articles

Back to top button
कॉपी करू नये