ग्रामीण वार्ताताज्या घडामोडीमहाराष्ट्र

शेगाव( बु.) येथे ग्राहक संरक्षण कायदा विषयक मार्गदर्शन संपन्न.

चांदा ब्लास्ट

शेगाव(बु. ) तालुका वरोरा जिल्हा चंद्रपूर येथे संत महोत्सव निमित्ताने आयोजित ग्राहक संरक्षण कायदा विषयक मार्गदर्शन कार्यक्रम गुरूवार दिनांक ७ डिसेंबर २०२३ ला संपन्न झाला.

अध्यक्षस्थानी अखिल भारतीय ग्राहक पंचायत चंद्रपूर जिल्हाध्यक्ष तथा अशासकीय सदस्य जिल्हा ग्राहक संरक्षण परिषद चंद्रपूर नंदिनी प्रकाश चुनारकर ह्या होत्या.

प्रमुख मार्गदर्शक ग्राहक तक्रार निवारण आयोग जिल्हा चंद्रपूर चे माजी सदस्य कल्पना जांगडे ह्या होत्या.
यावेळी ग्राहक पंचायत चे पदाधिकारी पुरूषोत्तम मत्ते,वामन नामपल्लीवार, वसंत वऱ्हाटे, सुदर्शन तुंडूलवार, ढवळे उपस्थित होते.

याशिवाय आशिष कोटकर, मनिषा पटेल, विलास निखाते, विनोद राऊत, किशोर साखरकर, विनोद कोटकर, पुरूषोत्तम रडांगळे, आशिष कोटकर, विलास निंबार्ते यांची प्रामुख्याने उपस्थिती होती.

कार्यक्रमाचे सूत्रसंचालन व आभारप्रदर्शन रविंद्र साखरकर यांनी केले. संपूर्ण कार्यक्रमाचे नियोजन व आयोजन आशिष कोटकर ग्राहक पंचायत पदाधिकारी शेगाव(बु )यांनी केले.

नंदिनी प्रकाश चुनारकर यांनी आपल्या अध्यक्षीय भाषणातून सर्व नागरिकांनी ग्राहक शिक्षण घेणे हे फार महत्त्वाचे असल्याचे स्पष्ट करतांनाच ग्राहक कायद्यान्वये प्राप्त अधिकाराप्रती ग्राहकांनी अधिक जागृत राहण्याचे आवाहन केले ‌. ग्राहकांनी अन्याय विरूद्ध लढा देऊन ग्राहक हा राजाच असल्याचे यावेळी प्रतिपादन केले.

प्रास्ताविकातून वामन नामपल्लीवार यांनी ग्राहक संरक्षण कायद्याबद्दल माहिती दिली. प्रमुख मार्गदर्शक कल्पना जांगडे यांनी ग्राहक तक्रार निवारण आयोगाचे महत्त्व पटवून देऊन जिल्हा ग्राहक आयोग, राज्य ग्राहक आयोग, राष्ट्रीय ग्राहक आयोग याबद्दल माहिती दिली.

पुरूषोत्तम मत्ते यांनी ग्राहकांना संगठीत होण्याचे आवाहन करून वस्तूचे बिल घेण्याचा आग्रह धरला.
कार्यक्रमाला विद्यार्थी, शिक्षक, नागरिक बहुसंख्येने उपस्थित होते. अखिल भारतीय ग्राहक पंचायतचे सध्या सुवर्ण महोत्सवी वर्ष असून त्यानिमित्ताने जिल्ह्यात विविध ठिकाणी ग्राहक शिक्षण मार्गदर्शन कार्यक्रम घेण्यात येत आहे.

शेअर करा

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
कॉपी करू नये