Sudarshan Nimkar
ग्रामीण वार्ताताज्या घडामोडीमहाराष्ट्र

“अखेर श्रावण बाळ योजना आणि संजय गांधी निराधार योजनेच्या निधीची उपलब्धता”

चार महिन्यांपासून रखडले होते अनुदान ; अनुदानात झाली वाढ हजार ऐवजी दिड हजार रूपये मिळणार

चांदा ब्लास्ट प्रतिनिधी. प्रा.शेखर प्यारमवार

अतुलभाऊंनी सतत पाठपुरावा करून अनुदानाची रक्कम आणली खेचून

      सावली तालुक्यातीलच नव्हे तर अख्या राज्यातील संजय गांधी निराधार व श्रावणबाळ योजनेच्या अनुदानाची रक्कमेची या योजनेचे लाभार्थी गेल्या काही महिन्यांपासून चातकासारखी वाट पाहत होते. निराधार, वृद्ध,अंध, अपंग, शारीरिक तसेच मानसिक आजाराने ग्रस्त, विधवा, घटस्फोटीत महिला, ह्या आर्थिक दृष्ट्या दुर्बल असतात पर्यायाने त्यांचा उदरनिर्वाह तथा सणसमारंभ या योजनेच्या अनुदानावरच अवलंबून असतो.

    लाभार्थ्यांची ही व्यथा लक्षात घेऊन ब्रम्हपूरी विधानसभा क्षेत्राचे गोर गरीब जनतेचे कैवारी लोकप्रिय नेते माजी आमदार प्रा. अतुल भाऊ देशकर यांनी जिल्ह्याचे पालकमंत्री मान.नामदार सुधीर भाऊ मुनगंटीवार तसेच महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री मान. नाम. देवेंद्रजी फडणवीस यांचेशी संवाद साधून तालुक्यातील या योजनेच्या लाभार्थ्यांची आर्थिक स्थिती अवगत केली होती.आणि लवकरात लवकर अनुदानाचा निधी उपलब्ध करुन द्यावा. अशी वारंवार सांगून या योजनेच्या अनुदानाची रक्कम खेचून आणली. यासाठी सततच्या पाठपुराव्यामुळे उपमुख्यमंत्री मा.ना.देवेंद्र फडणवीस, पालकमंत्री मा.ना.सुधीरभाऊ मुनगुंटीवार यांनी सकारात्मक उत्तर देऊन लवकरच अनुदानाची रक्कम उपलब्ध केल्या जाईल असा शब्द दिला होता.

      त्यानुसार अनुसूचित जाती प्रवर्गातील लाभार्थ्यांची जुलै आगष्ट सप्टेंबरचे संजय गांधी निराधार योजना आणि श्रावणबाळ योजनेचे अनुदान प्राप्त झाले असून  सर्वसाधारण प्रवर्गातील संजय गांधी योजनेचे

जुलै, ऑगस्ट,सप्टेंबर,श्रावणबाळ योजनेचे जुन,जुलै अनुदान प्राप्त झाले.तहसीलदार यांचेकडे अनुसूचित जाती प्रवर्गातील अनुदान पाठवले असुन बिल सुध्दा काढलेले आहेत सर्वसाधारण प्रवर्गातील लाभार्थ्यांच्या अनुदानाची फाईल कलेक्टर कडे काल रात्री गेली होती. कलेक्टरची सही होताच अनुदान तात्काळ उपलब्ध होणार आहे.

       दिलेल्या शब्दाची काटेकोर अंमलबजावणी केल्याबद्दल ब्रम्हपूरी विधानसभा क्षेत्राचे लोकप्रिय माजी आमदार आदरणीय प्रा अतुलभाऊ देशकर यांनी उपमुख्यमंत्री मा.नाम.देवेंद्र फडणवीस आणि वने सांस्कृतिक कार्य तथा मत्स्य व्यवसाय मंत्री मा.नाम.सुधीरभाऊ मुनगंटीवार यांचे आभार मानले.

संजय गांधी निराधार अनुदान योजना समिती सावलीचे अध्यक्ष प्रकाश गड्डमवार  यांचेसह समितीचे सदस्य , सतिश बोम्मावार, आशिष कार्लेकर, गंगाधर धारणे, शोभा बाबनवाडे, कोंड्या बोदलकर, पत्रुजी गेडाम, दिलीप ठीकरे, शारदा गुरणूले,अरुण पाल इ.नी उभयतांचे आभार मानले.

याबरोबरच भाजपाचे ज्येष्ठ नेते प्रकाश खजांची, अशोक आकुलवार, अविनाश पाल, अर्जुन  गेडाम, युवा नेता गौरव संतोषवार, राकेश विरमलवार, राकेश कोडंबत्तुलवार, निलिमा सुरमवार, मयूर गुरणूले, राहुल लोडेल्लीवार इत्यादींनी अभयंताचे आभार मानले.

शेअर करा

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
कॉपी करू नये