ग्रामीण वार्ताताज्या घडामोडीमहाराष्ट्र

१६ ऑक्टोबरला भास्कर पेरे पाटील स्मार्ट ग्राम बिबीत

'ग्रामसंवाद' कार्यक्रमाचे आयोजन

चांदा ब्लास्ट प्रतिनिधी. अशोक डोईफोडे

कोरपना – जिल्हा स्मार्ट ग्राम बिबी, अल्ट्राटेक कम्युनिटी वेल्फेअर फाउंडेशन, आवारपूर व कॅलिबर फाउंडेशन, गडचांदूर यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित ‘ग्रामसंवाद’ या कार्यक्रमाच्या निमित्ताने आदर्श सरपंच भास्कर पेरे पाटील १६ ऑक्टोबरला सायंकाळी ६.०० वाजता जिल्हा स्मार्ट ग्राम बिबी येथे उपस्थित राहणार आहे.

भास्कर पेरे पाटलांच्या हस्ते तालुक्यातील १६ ग्रामपंचायतीच्या सरपंचांचा, गुणवंत विद्यार्थी व काही मान्यवरांचा सत्कार करण्यात येणार आहे. यावेळी तंबोला खेळाचे आयोजन करण्यात आले असून सर्व धर्मीय सामुदायिक प्रार्थनेने कार्यक्रमाला सुरुवात होणार आहे.

ग्रामसंवाद या कार्यक्रमाचा तालुक्यातील नागरिकांनी मोठ्या संख्येने लाभ घ्यावा असे आवाहन ग्रामपंचायत बिबीच्या सरपंच माधुरी टेकाम, उपसरपंच आशिष देरकर, ग्राम विकास अधिकारी धनराज डुकरे व ग्रामपंचायत सदस्यांनी केले आहे.

शेअर करा

Related Articles

Back to top button
कॉपी करू नये