ग्रामीण वार्ताताज्या घडामोडीमहाराष्ट्र

भद्रावतीत भव्य धम्म शोभायात्रेचे आमदारांकडून स्वागत

शोभायात्रेत हजारोच्या संख्येने बौद्ध बांधवांची उपस्थिती

चांदा ब्लास्ट प्रतिनिधी. अतुल कोल्हे

भद्रावती मध्ये भव्य धम्म्य शोभायात्रेचे आयोजन करण्यात आले होते. या यात्रेत हजारोच्या संख्येने बौद्ध बांधवांची उपस्थिती दर्शवली. भद्रावतीच्या मुख्य रस्त्यावर धम्म शोभा यात्रेच्या आयोजक, अध्यक्ष तसेच इतर पदाधिकाऱ्यांचा आमदार प्रतिभा धानोरकर यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला.

डॉ. बाबासाहेब आंबेडकर चौकात धम्म शोभा यात्रेचे आयोजन करण्यात आले मान्यवराचे मनोगत झाल्यानंतर ही वाज्याच्या गजरात भद्रावती शहरातून काढण्यात आली या यात्रेचे आयोजक ,अध्यक्ष भूपेंद्र गावंडे, अमित नगराळे, नितीन देवगडे, कुशल मेश्राम तसेच इतर पदाधिकाऱ्यांचा आमदार प्रतिभा धानोरकर यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला यावेळी नगराध्यक्ष अनिल धानोरकर, प्रशांत काळे, सुरज गावंडे, विनयबोधी डोंगरे, प्रशांत झाडे, शितल गेडाम, सरिता सूर आधी पदाधिकारी उपस्थित होते या रॅलीत भव्य देखावे होते शोभायात्रेतील अनुयानांना भोजनदान देण्यात आले या यात्रेत मोठ्या प्रमाणात जनसमुदाय उपस्थित होता.

शेअर करा

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
कॉपी करू नये