ग्रामीण वार्तामहाराष्ट्र

मंत्रीं धर्मरावबाबा आत्राम यांची चंद्रपूर जिल्हा राष्ट्रवादी काँग्रेस पदाधिकाऱ्यांची भेट घेत समस्या व विकास कामांबाबत चर्चा

चांदा ब्लास्ट

           महाराष्ट्र राज्याचे अन्न व औषधी प्रशासन मंत्री तथा गोंदिया जिल्ह्याचे पालकमंत्री नामदार धर्मराव बाबा आत्राम यांनी चंद्रपूर जिल्ह्यातील राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या जिल्हा कार्यकारणी पदाधिकाऱ्यांची भेट घेत आढावा घेतला.

यावेळी जिल्हाध्यक्ष नितीन भटारकर यांनी चंद्रपूर जिल्ह्याच्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष संघटने बांधणी बाबत झालेल्या प्रगतीचा आढावा सादर करीत पदाधिकारी, कार्यकर्त्यांनी तालुक्यातील समस्या व विकास कामांबाबत आणलेल्ले निवेदने मंत्री महोदयांना देत संबंधित अधिकाऱ्यांना निर्देश द्यावे किवा बैठक लावावी अशी मागणी केली.

जिल्ह्यातील कोळसा खाणीतील कामगार व प्रकल्पग्रस्त, वन्यप्राण्यांमुळे होत असलेले शेतकऱ्यांचे नुकसान, जिवती तालुक्यातील वन कायद्यामुळे विकास कामावर झालेला परिणाम, आदिवासी व मागासवर्गीय समाजातील घरकुल बांधकाम रखडल्या बाबत, ग्रामीण भागातील रस्ते व इतर रखडलेल्या विकास कामाबद्दलचे निवेदने मंत्रिमहोदयानी स्विकारत स्थानिक प्रश्न जिल्हास्तरावर सोडवू व इतर प्रश्नांसंदर्भात उपमुख्यमंत्री मा.अजित दादा पवार यांच्याकडे बैठक घेऊन योग्य तो मार्ग काढण्यात येईल अशी हमी दिली.

यावेळी काही पदाधिकार्यांच्या नामदार आत्राम यांच्या हस्ते नियुक्त्या करण्यात आल्या. चंद्रपूर, मुल व घुग्गुस येथील विविध पक्षातील कार्यकर्त्यांनी राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश केला. पुढील काळात राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या पदाधिकारी व कार्यकर्त्यांच्या पाठीशी भक्कमपणे राहणार असुन पक्षातर्फे ताकत देण्याचे काम करण्यात येईल अशी ग्वाही धर्मराव आत्राम यांनी उपस्थितांना दिली. गोंदिया जिल्हयाच्या पालकमंत्री पदी निवड झाल्याबद्दल जिल्हा राष्ट्रवादी काँग्रेस तर्फे मा. धर्मराव आत्राम यांचा सत्कार करण्यात आला.

यावेळी राष्ट्रवादी काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष नितीन भटारकर, प्रदेश सहसचिव आबीदजी अली, शहर अध्यक्ष राजीव कक्कड, राष्ट्रवादी युवक काँग्रेस जिल्हाध्यक्ष राकेश सोमानी, वरोरा विधानसभा अध्यक्ष विलास नेरकर, चंद्रपूर विधानसभा अध्यक्ष सुनील काळे, विद्यार्थी जिल्हाध्यक्ष सुजित उपरे, नगरसेवक महेंद्रसिंह चंदेल, चंद्रपूर तालुका अध्यक्ष श्रीनिवास गोसकुल्ला, मुल तालुका अध्यक्ष मंगेश पोटवार, राजुरा तालुका अध्यक्ष संतोष देरकर, वरोरा तालुका अध्यक्ष रवी भोयर, कार्याध्यक्ष तणवीर शेख, भद्रावती शहर अध्यक्ष गितेश सातपुते, हर्षवर्धन पिपरे, रकीब शेख, रवि डिकोंडा, आकाश येसणकर, चंद्रकांत कुंभारे, अल्पसंख्याक शहर अध्यक्ष नौशाद शेख उपस्थित होते.

तसेच पदाधिकारी पंचायत समिती सदस्य पंकज ढेंगारे, तिमोती बंडावार, माजी सरपंच अमोल ठाकरे, माजी नगरसेवक कुतुबुद्दीन सिटी, दिपक तुरारे, रोशन फुलझेले, समीर शेख, अनुकूल खन्नाडे, अंकित ढेंगारे, किसन झाडे, सुजित कावळे, महेंद्र बाग, योहान इरगुराला, गणेश तामटकर, प्रदीप लांडगे, संजय खेवले, भोजराज शर्मा, प्रशांत झांबरे, नितीन घुबडे, सौरभ घोरपडे, ईश्वर बट्टे, रणजित ठाकूर, पियुष चांदेकर, अमर गोमासे, रोशन ढवळे, मनोज सोनी, राहुल देवतळे, पंकज जाधव, सिहल नगराळे, पवन बंडीवार, राजकुमार खोब्रागडे, सनी शर्मा, निलेश टोंगे, आसिफ शेख, राहुल भगत यांच्यासह मोठ्या संख्येने कार्यकर्ते उपस्थित होते.

शेअर करा

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
कॉपी करू नये