चंद्रपूरचांदाब्लास्ट विशेषविदर्भ

वरोरा शहरात असलेली श्री अंबादेवी विदर्भातील एक जागृत देवस्थान

अंबादेवीचे मंदिर हे वरोरा शहरातील लोकांचा प्रमुख श्रद्धेचं स्थान ठरलेलं आहे

चांदा ब्लास्ट प्रतिनिधी.अतुल कोल्हे

श्री अंबादेवी चंद्रपूर जिल्ह्यातील वरोरा तालुक्यातील हे जागृत दैवत हे तेथे भाविकाने येणाऱ्या भक्तांचा प्रचिती मुळे ओळखले जाते. आज पर्यंत अनेकांच्या हजारो भक्तांना पावलेलीं आहेस तरी हे कसं जाणून घेऊयात.
चंद्रपूर जिल्ह्यातील वरोरा शहरात असलेलं श्री अंबादेवीचे मंदिर हे एक जागृत असल्याचे हजारो भाविकांची श्रद्धा आहेत वरोरा शहरात नाही तर समस्त तालुका विदर्भात हे जागृत देवस्थान आहेत इथल्या शहरात व भाविकांच्या मनात देखील एक महत्त्वाचं विशेष स्थान आहे येथील परिसरात समाज जीवनात पवित्र वातावरणाचा प्रमुख स्थान आहेत. मंदिराचा इतिहास हा जेमतेम एकशे पंचावन्न वर्षे जरी असला तरी अतिशय रंजक आहेत हे अंबादेवीचे मंदिर सध्या ज्या ठिकाणी आहेत तो खांजी या नावाने ओळखला जाणून ज्या ठिकाणी तो खांजी परिसर पूर्वी छोटासा खेळगाव होता हा भाग जंगल आणि शेती ने व्यापलेला होता त्या काळात वरोरा ची मालगुजारी सरमुकद्धम यांना श्री अंबादेवी खांजी परिसरात आपलं वास्तव्य असल्याचा सांकेतिक दृष्टांत दिला. त्यानुसार सरमुकद्धम यांनी दामू पाटील सातपुते यांच्या शेतात खोदकाम केले. आणि तेथे त्यांना हि देवीची सिंदुरचर्चित मूर्ती आढळून आली त्यांनी ही मूर्ती जंगल परिसरात असलेल्या एका छोट्या टेकडीवर स्थापित केली. आणि तेथे छोटेसे मंदिर बांधले कालांतराने लोक वस्ती वाढल्याने या भागातील शेती जंगल नष्ट झाले. नंतर खांजी हे गाव वरोऱ्यात समाविष्ट झाले मंदिराचा आसपास वस्ती झाली. मंदिरात येणाऱ्या भक्तांना श्री अंबा देवीची प्रचिती यायला लागली आणि त्यामुळे भक्तांच्या सहकार्याने येथे श्री अंबा देवी चा मंदिर उभारून ते साकारण्यात आलं नंतर या मंदिरातच ट्रस्ट मंडल 1984 पासून निर्माण झाली आहेत तेव्हापासून या मंदिरासाठी विविध कार्यक्रमासाठी ट्रस्ट चे पदाधिकारी प्रयोजन करत असतात मंदिरात असलेली देवीची मूर्ती ही जवळपास तीन फूट उंच असून ती काहीसी समोर झुकल्या सारखे रांगत्या अवस्थेत स्वरूपाची दिसते. नित्यनियमाने देवीची महापूजा अर्चना केली जाते. आरती भजन प्रसादाला लोक नेहमी येतात. मंगळवारी आणि शुक्रवारी या देवळात विशेष गर्दी असते याशिवाय आश्विन व चैत्र नवरात्री येथे मोठी यात्रा भरते. नवसाला पावणारी अशी आई अंबा देवीचे पंचक्रोशीत छाती आहेत अनेक भाविक भक्त तिला आपली सुखदुःख सांगतात मनातली इच्छा पूर्ण झाली की देवीला धान्य पैसे सोने चांदी दागिने दान स्वरूपात अर्पण करतात या सर्व गोष्टींचा बाबतीत उपयोग मंदिराच्या विस्तारित स्वरूप वाढविण्याकरता केला जातो देवीच मंदिर शहराच्या मध्यवर्ती भागात असल्यामुळे या मंदिरात लोकांची नेहमी अतिशय श्रद्धा भक्तीने गर्दी असते देवीच्या मंदिरात परिसरात काही क्षण घालवण्यासाठी दररोज येणारे लोकही अनेक आहेत त्यामुळे संकटात साथ देणारी भक्तांना तारून घेणारी देवी अंबाबाई खऱ्या अर्थाने वरोरा शहराची ही जननी ठरलेली आहे. अंबादेवीचे मंदिर हे वरोरा शहरातील लोकांचा प्रमुख श्रद्धेचं स्थान ठरलेलं आहेत.
वरोरा येथील अंबादेवी देवस्थानात नवरात्री उत्सव मोठ्या उत्सवाने पवित्र अशा वातावरणात भक्तिभावाने साजरा केला जातो दर्शनासाठी भाविकांची पहाटे तीन ते चार वाजता पासून गर्दी दिसून येते या मंदिरात संत गाडगेबाबा, संत तुकडोजी महाराज यांनीही या देवस्थानाला भेट दिली असून ते कीर्तनाद्वारे लोकजागृतीचे कार्य केले श्री अंबा देवी देवस्थान, खांजी. वरोरा. जिल्हा. चंद्रपूर. येथील मंदिराचे ट्रस्टी मंडळ कार्यकारणी श्री जयंत टेमुर्डे अध्यक्ष, श्री पांडुरंग जांबुळकर उपाध्यक्ष, प्रा श्री रामभाऊ पारखी सचिव, अँड. श्री विजय पावडे सहसचिव, श्री. प्रा. संबा गारकाटे कोषाध्यक्ष, अँड. श्री. मोरेश्वर टेमुर्डे. सदस्य, प्रा श्री अशोक पारखी. सदस्य, श्री गणेश जीवतोडे. सदस्य, श्री प्रवीण आगलावे सदस्य, स्व. कुसुम सिरसकर. सदस्य, श्रीमती. निलप्रभा घाटे. सदस्य, असुन श्री अंबा देवीच्या आशीर्वादाने व भक्तांच्या सहकार्याने देवस्थानाचे विस्तारित काम पूर्ण करण्याचा ट्रस्टी मंडळांचा संकल्प आहे.

 

 

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button