विरंगुळा भवन येथे भारतरत्न, महामानव डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांची जयंती साजरी

चांदा ब्लास्ट प्रतिनिधी. प्रा. अशोक डोईफोडे
देऊळगाव राजा तालुका सेवानिवृत्त कर्मचारी संघटना, जनसेवा सामाजिक संघटना, व स्व भास्करराव शिंगणे सार्वजनिक वाचनालय देऊळगाव राजा यांच्या संयुक्त विद्यमाने भारतीय राज्य घटनेचे शिल्पकार भारतरत्न डॉ बाबासाहेब आंबेडकर यांची जयंती साजरी करण्यात आली.
कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी संघटनेचे अध्यक्ष बळीराम मापारी होते. सर्वप्रथम डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेचे पूजन करून पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले.
याप्रसंगी प्रकाश खांडेभराड, रमेश नरोडे, प्रकाश अहिरे, गोविंदराव बोरकर, प्रा अशोक डोईफोडे, सुशील हनुमंते, सी टी तांबटकर, मधुकर शेळके, कैलास इराळे, दिनकर जाधव उपस्थित होते. याप्रसंगी उपस्थित मान्यवरांनी डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या जीवनपैलुवर प्रकाश टाकला.
संचालन प्रकाश खांडेभराड यांनी केले तर आभार प्रदर्शन प्रकाश अहिरे यांनी मानले.
या कार्यक्रमानंतर संघटनेच्या वतीने डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्याला पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले.