ग्रामीण वार्ताताज्या घडामोडीमहाराष्ट्र

सिपेटच्या रोजगाराभिमुख कार्याचा हंसराज अहीर यांनी घेतला आढावा

सिपेट रोजगार निर्मितीला चालना देणारे महत्वपुर्ण केंद्र _ हंसराज अहीर

चांदा ब्लास्ट

महाज्योतो संस्थेद्वारा २ हजार ओबीसी विद्यार्ध्यांना मोफत प्रशिक्षण देणार

चंद्रपूर : चंद्रपुर येथील सेंट्रल इन्स्टिट्‌युट ऑफ पेट्रोकेमिकल ऍण्ड टेक्नॉलॉजी (सिपेट) या संस्थेच्या कार्याचा राष्ट्रीय मागासवर्ग आयोगाचे अध्यक्ष हंसराज अहीर यांनी दिनांक ०८ एप्रिल रोजी आढावा घेतला. वेकोलि वणी क्षेत्रातील मुख्य महाप्रबंधक कार्यालयात पार पडलेल्या या आढावा बैठकीत सिपेटचे प्रमुख अवनितकुमार जोशी, वेकोलिचे मुख्य महाप्रबंधक आभासचंद्र सिंह व सिपेट मधील प्रशिक्षित विद्यार्थी उपस्थित होते.

            यावेळी हंसराज अहीर यांनी संस्थेच्या माध्यमातून राबविण्यात येणाऱ्या रोजगाराभिमुख कौशल्यविकास कार्यकमाची माहिती जाणून घेतली तसेच प्रशिक्षणानंतर निर्माण झालेल्या रोजगार व स्वयंरोजगार विषयक संधीचा आढावा सुध्दा घेतला. सन २०२१-२२ पासून आजपर्यंत सिपेट मार्फत एकूण ७७५१ युवक-युवतींनी विविध प्रशिक्षण कार्यकम पुर्ण केलेले आहे. सोबतच प्लास्टिक उद्योग क्षेत्रात रोजगाराची संधी सुध्दा त्यांना मिळाली असल्याची संस्थेच्या माध्यमातून अहीर यांना माहिती देण्यात आली.

हंसराज अहीर यांच्या विशेष पुढाकारातून सिपेटची चंद्रपुरात उभारणी झाली असून आजपर्यंत शेकडो विद्यार्थ्यांनी इथे प्रशिक्षण घेवून रोजगार व स्वयंरोजगार मिळविला आहे. संस्थेच्या रोजगाराभिमुख उपक्रमाबद्दल अहीर यांनी संस्थेच्या कार्याचे कौतुक केले आहे. सिपेटसोबत नुकताच पॉवर ग्रीड कॉर्पोरेशन नागपुर द्वारा सिएसआर अंतर्गत २०० सुशिक्षित युवक-युवतींसाठी सहा महिन्यांच्या अल्पकालीन प्रशिक्षण कार्यक्रमाकरीता सामंजस्य करार करण्यात आलेला आहे. यापुर्वी महाज्योती नागपुर संस्थेमार्फत विदर्भातील २००० ओबीसी विद्यार्थ्यांना निःशुल्क प्रशिक्षण देण्यासाठी मंजुरी मिळाली असल्याचेही अहीर यांना श्री जोशी यांनी सांगीतले. सदर प्रशिक्षणास लवकरच सुरुवात होणार असल्याचेही ते म्हणाले, प्रशिक्षण कालावधीत निवास, भोजन, प्रशिक्षण किट आदी बाबी मोफत देण्यात येणार असून या प्रशिक्षित विद्यार्थ्यांना सिपेट मार्फत प्लास्टीक उद्योगात रोजगाराच्या संधी उपलब्ध करण्यासाठी विशेष प्रयत्न करण्यात येतील असेही सिपेट द्वारा सांगण्यात आले.

              यावेळी हंसराज अहीर यांनी वेकोलि प्रायोजित कौशल्य विकास कार्यक्रमातील प्रशिक्षणार्थीसोबत संवाद साधला. त्यांच्या अडचणी समजुन घेतल्या. अमित मेश्राम, सौरभ भजनकर, ऋतु दडमल या विद्यार्थ्यांनी टाकावु वस्तुपासून सायकल तयार केली. त्यांना चंद्रपुर मनपा द्वारा रु. ५०००/- चे पारितोषिक प्रदान करण्यात आले. या विद्यार्थ्यांचा अहीर व वेकोलि मुख्य महाप्रबंधकांनी प्रशस्तीपत्र देवून सम्मानित केले.

           प्रसार व जनजागृतीचे सिपेट मार्फत प्रयत्न होत असले तरी अजुनही विदर्भातील अनेक विद्यार्थ्यांना या मोफत प्रशिक्षण व रोजगार संधीब‌द्दल पुरेशी माहिती मिळत नसल्याने सिपेट ने प्रशिक्षण कार्यक्रमाचा व्यापक स्तरावर प्रचार करावा अशी सुचना हंसराज अहीर यांनी सिपेट प्रमुखांना केली. त्यांनी येथे कार्यरत सुरक्षाकर्मी व सफाई कर्मचाऱ्यांना किमान वेतन श्रेणीनुसार वेतन व भत्ते दिल्या जातात कां या विषयी चौकशी करुन शासन नियमानुसार वेतन, भत्ते देण्याची सुचना केली. स्थानिकांना प्रशिक्षणात प्राधान्य देण्याविषयी सुचित केले.

महाज्योतो संस्थेद्वारा २ हजार ओबीसी विद्यार्ध्यांना मोफत प्रशिक्षण देणार

शेअर करा

Related Articles

Back to top button
कॉपी करू नये