महात्मा फुले यांनी केलेले कार्य अजरामर
राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाच्यावतीने महात्मा फुले यांना अभिवादन
चांदा ब्लास्ट प्रतिनिधी. प्रा. अशोक डोईफोडे
राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरदचंद्र पवार पक्षाच्या वतीने क्रांतीसुर्य महात्मा फुले यांच्या जयंतीदिनी फुल पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले. यावेळी राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे कार्यकर्ते व पदाधिकारी उपस्थित होते.
देऊळगाव राजा येथे राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरदचंद्र पवार पक्षाच्या वतीने क्रांतीसुर्य महात्मा ज्योतिराव फुले यांची जयंती साजरी करण्यात आली. प्रथम महात्मा फुले यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले.
यावेळी कृषी उत्पन्न बाजार समितीचे माजी सभापती रंगनाथ कोल्हे, गजानन पवार,राष्ट्रवादीचे तालुकाध्यक्ष राजेश इंगळे, शहराध्यक्ष विजय खांडेभराड, राष्ट्रवादीचे नेते गणेश बुरकुल, महेश देशमुख, माजी नगराध्यक्ष विष्णू रामाने,विलास खराट, नरोडे सर,गौरव वायाळ, नवनाथ गोमदरे, रफिक भाई, किसन नागरे, जनार्धन मगर यांची प्रमुख उपस्थिती होती. दरम्यान अनेक मान्यवरांनी महात्मा फुले यांच्या जीवन कार्यावर प्रकाश टाकला. त्यामध्ये राष्ट्रवादीचे तालुकाध्यक्ष राजेश इंगळे यांनी म्हटले की,ज्ञान आणि बुद्धिमत्तेवर विशिष्ट एकाच समाजाची पकड असावी, ही हजारो वर्षाची तथाकथित परंपरा सर्वात आधी मोडीत काढणारे जे कोणी असतील त्यामध्ये सर्वात पहिले नाव म्हणजे महात्मा फुले यांचेच आहे. जातीव्यवस्था, भेदभाव आणि स्त्रियांना दिली जाणारी दुय्यम वागणूक या विरोधात महात्मा फुले यांनी केलेले कार्य अजरामर आहे.
राष्ट्रवादीचे नेते गणेश सवडे यांनी आपले विचार मांडताना म्हटले की, महात्मा फुले यांचे कार्य कोण्या एका जातीसाठी नसून संबंध मानव जातीला न्याय देणारे होते.
एखाद्या महिलेचा पती वारल्यानंतर तिच्या डोक्यावरचे केस उपटून काढले जायचे, ही अतिशय विकृत पद्धत समाजातील एका घटकात रूढ झाली होती. त्याला विरोध हा महात्मा फुले यांनीच केला. स्त्रियांना शिक्षण द्यायचे नाही, हा जर कर्मकांडातील आदेश होता, त्याला पहिला हादरा फुले दापत्यांनी दिला.कार्यक्रमाचे आभार प्रदर्शन शहराध्यक्ष विजय खांडेभराड यांनी केले.