निधन वार्ता _ माजी उपसरपंच भगवान आभारे यांचा दुःखद निधन
चांदा ब्लास्ट प्रतिनिधी. डॉ. शेखर प्यारमवार
व्याहाड खुर्द येथील रहिवासी ग्रामपंचायत चे माजी उपसरपंच भगवान आभारे यांचा आज (दि 8 एप्रिल 25) रोजी सकाळी 8 वाजता अल्पशा आजाराने दुःखद निधन झाले.
व्याहाड खुर्द येथील रहिवासी भगवान ऋषींजी आभारे, वय 58 वर्ष हे मागील वर्षा पासून कर्करोगाने ग्रस्त होते. कर्करोगावर औषधं उपचार सुरु केले. यामध्ये त्यांच्या आरोग्यात बरीच सुधारणा झाली. सुधारणा होताच त्यांच्यात असलेली कला गुण भजन, दंडार, नाटक, सामाजिक व सांस्कृतिक उपक्रम तथा कार्यक्रमात नेहमी सहभाग व सहकार्य करीत असायचे. त्यांनी ग्रामपंचायत मध्ये माजी उपसरपंच, जय हनुमान मंदिर कमेटीचे माजी अध्यक्ष तथा सचिव पद, गुरुदेव सेवा मंडळ चे सदस्य आणि विविध कार्यकारी सहकारी सोसायटी चे माजी सदस्य म्हणून पदभार सांभाळला.
आज आपल्या राहत्या घरी सकाळी उठून चहा नास्ता ज्यूस औषधं घेऊन नातेवाईकांशी व गावातील नागरिकांशी हसत खेळत संवाद साधत बोलत चालत होते.यात अचानक त्यांची प्रकृती बिघडली आणि यातच त्यांचा दुःखद निधन झाले. त्यांच्या मृत्यू पश्चात मोठा भाऊ, पत्नी, एक मुलगा, दोन मुली, जावई नातवंड असा आप्त परिवार आहे. अशा सामाजिक कार्यकर्ता जाण्याने गावात व परिसरात हळहळ व्यक्त केल्या जात आहे.